15/08/2026
शाळेतील ध्वजारोहणातून देशप्रेमाचा नवचैतन्य सोहळा!
📍 औंध.
📆शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
भावी पिढीमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी आणि स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा ताजा करण्यासाठी औंधगाव व्यायाम मंडळ व इंदिरा गांधी स्कूल येथे आयोजित ‘ध्वजारोहण सोहळ्यात’ सहभागी होऊन राष्ट्रध्वजाला सन्मानाने वंदन केले.
विद्यार्थ्यांचा अथांग उत्साह, तिरंग्याप्रती असलेली निष्ठा आणि देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने संपूर्ण प्रांगण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना देशसेवा आणि अभ्यासाबाबत आवश्यक मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंदिरा गांधी स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक, औंधगाव व्यायाम मंडळातील सर्व सभासद, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
संस्कारक्षम पिढी, राष्ट्रनिष्ठा आणि उज्वल भविष्य — हाच संकल्प!
#ध्वजारोहण #शाळा #स्वातंत्र्यदिन #देशभक्ती
शिक्षण | संस्कार | देशसेवा | उज्ज्वलभविष्य
🌷🌷🌷🌷🌷
सौ. भक्ती अजीत गायकवाड
नगरसेविका, पुणे मनपा
सदस्य, महिला व बालकल्याण समिती
उपाध्यक्षा, औंध सोशल फाउंडेशन
━━━━━✧❂✧━━━━━
अभिजीत सुभाषदादा गायकवाड
अध्यक्ष, औंध सोशल फाउंडेशन
Abhijitgaikwad Bjp