Arish Builders and Developers

Arish Builders and Developers We Build With Trust

Site@ Vadgav saddo
17/10/2022

Site@ Vadgav saddo

28/02/2022

घर बांधणाऱ्या प्रत्येकासाठी!!!!

आपल घर बांधकाम करताना, कोणत्या कामा नंतर कोणतं काम सुरू होणार किंवा कोणत काम सुरू करावं हे तुम्हाला माहीत असावं म्हणून आजचा लेख.

आपल्या घर बांधकामाचे टप्पे.

1. Line out
2. खोदकाम
3.pcc - Line out
4.footing - line out
5.फुटिंग कॉलम
6.GB(ग्राउंड बीम)
7. वीट बांधकाम (प्लिंथ लेव्हल)
8. मुरूम भराई
9. PB (प्लिंथ बीम)
10. मुरूम धुमसणे
11. प्लिंथ PCC
12. Line Out (ग्राउंड फ्लोअर कॉलम)
13. ग्राउंड फ्लोअर कॉलम
14. जिना (mid लँडिंगपर्यंत)
15. स्लॅब
16. ग्राउंड फ्लोअर विट बांधकाम लिंटेल लेव्हलपर्यंत
17. लिंटेल, लॉफ्ट, छज्जा
18. लिंटेलच्या वरती स्लॅब लेव्हलपर्यंत विट बांधकाम.
19. Parapet वॉल, जिना टोपी रूम
20. खिडक्यांची ग्रिल आणि रेलिंग
21. पत्र्याच रूफिंग किंवा स्लॅब जिन्याच्या टोपीवर
22. आतील प्लास्टर POP चे करणार असू तर अगोदर फरशी आणि ग्रॅनाईट बसविण्याचे काम करून घ्यावे आणि रेगुलर म्हणजे वाळूचे प्लास्टर करणार असू नंतर फरशी आणि ग्रॅनाईट चे काम केले तरी चालते.
23. बाहेरील प्लास्टर
24. आतील रंगकामासाठी वॉल पुट्टी
25. घरातील वायरिंग चे काम (लाईट फिटिंग)
26. घराच्या आतील रंगकाम
27. बाहेरील रंगकाम.
28. फायनल टचअप.

हे आहेत आपल्या घर बांधकामाचे टप्पे. कधी कधी काही टेक्निकल कारणास्तव किंवा कॉन्ट्रॅक्टर च्या आपापल्या काम करण्याच्या पध्दतीमुळे वरील पैकी एखादा टप्पा वर खाली होवू शकतो.

#सुंदर_घराचं_स्वप्न_साकार_करणारी_माणसं.
builders and developers Jamner

SBM unit For village area.
24/02/2022

SBM unit For village area.

 #वाकडी जामनेर
23/02/2022

#वाकडी जामनेर

12/02/2022

Completed site Pimpri
Owner:- Vilas bhaskar patil

घर बांधकाम करताना शटरिंग का करावे?आज आपण फॉर्म वर्क किंवा शटरिंग चे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ📌 आपल्या घराच्या आरसीसी  ...
10/02/2022

घर बांधकाम करताना शटरिंग का करावे?

आज आपण फॉर्म वर्क किंवा शटरिंग चे फायदे काय आहेत हे जाणून घेऊ

📌 आपल्या घराच्या आरसीसी मेंबरला आवश्यक तो आकार साइज देता येते.

📌 काँक्रीट व्यवस्थित साचेबद्ध झाल्याने घट्टपणा आल्यानंतर वेडावाकडा आकार दिसत नाही.

📌 कॉलम व्यवस्थित ओलंब्यात उभे राहतात.

📌 बीम लाईन दोरी मध्ये येतात.

📌 फॉर्मवर्क मुळे सिमेंट स्लरी वाहून जात नाही.

📌 प्रत्येक मेंबर चा centroid व्यवस्थित साधला जातो आणि लोड ट्रान्सफर चे काम आरसीसी मेंबर कडून व्यवस्थित होते.

📌 वेडावाकडा आकार येत नाही त्यामुळे लेबर कॉस्ट आणि वरील एक्स्ट्रा लागणारा प्लास्टर चा खर्च वाचतो.

📌वेळेची बचत होते.

📌 क्वालिटी वर्क होते.

या सर्व गोष्टींमुळे घर बांधकाम करताना शटरींग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लक्षात ठेवा!!

ग्राहक सुजाण
घर आयुष्यमान

©️Arish Builder's and Developers® जामनेर, जिल्हा- जळगाव

📳 - 9049529575
📧 - [email protected]

#सुंदर_घराचं_स्वप्न_साकार_करणारी_माणसं.

तुम्हाला माहित आहे का आपल्या घराचं माकड हाड??घर बांधणाऱ्या प्रत्येकासाठी!!!परवा असंच फेरफटका मारावा म्हणून रस्त्याने चाल...
10/02/2022

तुम्हाला माहित आहे का आपल्या घराचं माकड हाड??
घर बांधणाऱ्या प्रत्येकासाठी!!!

परवा असंच फेरफटका मारावा म्हणून रस्त्याने चाललो होतो. एके ठिकाणी घराचे बांधकाम चालू होते. घार कशी कितीही उंच आकाशात उडत असली तरी सुद्धा तिचे लक्ष आपल्या भक्षावर असते.अगदी अचूक ती आपल्या भक्षाचा वेध घेते. अगदी तसंच माझं सुद्धा झालंय. कुठे बाहेर पडलो आणि बांधकाम चालू दिसलं की आपोआप तिकडे नजर, लक्ष आणि पावलं वळतात.
मग गेलो त्या साईटवर. काळया मातीत ती साईट चालू होती. फाउंडेशन पूर्ण होऊन ग्राउंड फ्लोअर ला कॉलम उभारण्याचे काम चालू होतं. साईट बघत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या घराला ग्राउंड बीम आणि प्लिंथबिम ची रचना नव्हती. गावाकडच्या भाषेत म्हणायचं झालं तर रिंग बांधली नव्हती. (अर्थात साईट सुद्धा लोकल कॉन्ट्रॅक्टर कडून च करून घेतली असणार. आरसीसी कन्सल्टंट कॉन्ट्रॅक्टर स्वतः. हे आपसूकच लक्षात आलं)
घरमालकाला विचारलं असता घर बांधकाम बाबत त्यांना काहीही माहित नाही हे लक्षात आले. आता मोर्चा कॉन्ट्रॅक्टर कडे वळवला. परंतु त्याच्याशी बोलताना मी माझी ओळख सांगितली नाही. तो म्हणाला "अहो ९इंची बांधकाम केल आहे रिंग ची काय गरज??" मी त्याला म्हटलं "मला सुद्धा घर बांधायचे आहे काय रेट आहे तुमचा??"
तो सहज म्हणाला "बाराशे रुपये.!! थोड पुढे मागे होईल अजून तुम्ही काळजी करू नका"

आता मात्र मला सर्व पिक्चर क्लिअर झाला तिथे त्याने ग्राउंड बिम आणि प्लिंथ बिम ची रचना का केली नाही. मग मी त्यालाआ माझी ओळख सांगितली जरा लाजल्यासारखा झाला तो आणि म्हणाला "साहेब बाजूला येता का जरा? बाजू ला गेल्यानंतर म्हणाला."अहो हे रेट वाढवून देत नाहीत,मालाचे दर किती झाले तुम्हालाही माहित आहेच. परवडणार कसं? काम पण पाहिजे. मग कुठेतरी असा गपला मारावा लागतो. पण वरती रिंगा देणार आहे मी "असा म्हणाला पुढे तो.

आता मात्र मला त्या घर मालकाची आणि त्या कॉन्ट्रॅक्टर दोघांचीही कीव येत होती. परंतु स्वतःची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या घराशी खेळणं हे काही नाही पटलं मला. म्हणून आज ठरवलं तुम्हाला सांगायचं ग्राउंड बिम आणि प्लिंथ बीम चे महत्व सांगायचं.

एकदम सोप्या आणि पटणाऱ्या भाषेत सांगू का??
आपल्या शरीरात माकड हाड असते. ते नसते तर काय झालं असतं हो?? बर राहू शकलो असतो का आपण नीट?? तेच काम प्लिंथ बिम आणि ग्राउंड बीम करतात. आता आलं ना लक्षात....

📌 जमिनीत होणाऱ्या बदलामुळे म्हणजे बऱ्याचदा भूगर्भात होणाऱ्या आंतरिक बदलामुळे जमीन वर खाली होते. अशा वेळेस ग्राउंड बीम असेल तर ग्राउंड बिम असलेल्या बांधकामावर त्याचा परिणाम होत नाही.

📌 भिंतींचा भार व्यवस्थित बिम वर ट्रान्सफर होतो आणि तिथून तो जमिनीवर ट्रान्सफर होतो.

📌 आपल्या घरात ज्या आत मधील भिंती असतात त्यांना बॉटम सपोर्ट म्हणून प्लिंथ बिम ची रचना केली जाते.

📌 भिंतींना मजबूत असा पाया मिळतो.

📌 भिंतींना कालांतराने आडवा भेगा जातात त्या जात नाहीत.

📌 आपल्या घराचा भक्कम पणा अजून वाढतो म्हणतात.

आपण भाजी आणताना सुद्धा दहा वेळा विचार करून घेतो. स्वस्तात मिळते म्हणून सडलेली भाजी घरी आणत नाही. मग घर बांधताना हा विचार का करत नाही. ज्यासाठी आपण काडी काडी करून पैसे जमवतो, तीच दर्जेदार, टिकाऊ, दीर्घायु बनवून घेण्याऐवजी पैशांचा विचार करून तात्पुरते समाधान मिळवून घेतो. आणि त्या क्षणिक सुखासाठी आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने खडे फोडत बसतो. आपले विचार बदलण्याची आणि माहिती घेण्याची गरज आहे. तुमचे विचार तुम्हीच बदलू शकता परंतु, माहिती मात्र यश वास्तू तुम्हाला देऊ शकते अशा लेखांमधून....

लक्षात ठेवा!! अशा खूप काही घर बांधकामाच्या गोष्टी साठी संपर्क

©️ Arish builder and developers
तालुका- Jamner, जिल्हा- jalgaon

📳 -9049529575
📧 - [email protected]

02/02/2022
Fieldwork Unit Conversion
26/01/2022

Fieldwork Unit Conversion

Address

Jalgaon

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9049529575

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arish Builders and Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Arish Builders and Developers:

Share