18/04/2026
On this World Heritage Day,
we celebrate the timeless narrative carved in stone — the Kalyanasundara Murti at Gharapuri (Elephanta) Caves.
This sculptural panel captures the sacred union of Shiva and Parvati, rendered with remarkable compositional balance, refined iconography, and intricate craftsmanship. The depiction transcends a mere mythological event, embodying notions of cosmic harmony, ritual symbolism, and the synthesis of divine energies.
Set within the rock-cut architectural framework of the Elephanta Caves, this relief exemplifies the artistic and cultural sophistication of early medieval Indian craftsmanship. The spatial arrangement, expressive detailing, and narrative depth contribute significantly to the site’s outstanding universal value.
As we reflect on heritage, it becomes essential to recognize such sites not only as physical artifacts but as living cultural landscapes shaped by collective memory, tradition, and continued relevance.
या जागतिक वारसा दिनानिमित्त,
घारापुरी (एलिफंटा) लेण्यांतील कल्याणसुंदर मूर्ती या अद्वितीय शिल्पकलेचा गौरव करूया.
ही मूर्ती भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा प्रसंग दर्शवते, ज्यामध्ये सौंदर्य, संतुलन आणि सूक्ष्म शिल्पकौशल्य यांचे उत्कृष्ट दर्शन घडते. ही केवळ पौराणिक घटना नसून, विश्वात्मक समतोल, दैवी शक्तींचे एकत्रीकरण आणि सांस्कृतिक प्रतीकात्मकता यांचे प्रभावी प्रतिबिंब आहे.
घारापुरी लेण्यांच्या खडकात कोरलेली ही शिल्परचना प्राचीन भारतीय स्थापत्यकला आणि कलात्मक परंपरेची साक्ष देते. या ठिकाणाचा सांस्कृतिक संदर्भ, रचना आणि कलात्मक अभिव्यक्ती यांमुळे त्याला वैश्विक महत्त्व प्राप्त झाले आहे.
वारसा म्हणजे केवळ भौतिक अवशेष नव्हेत, तर त्या ठिकाणाशी जोडलेली परंपरा, स्मृती आणि स्थानिक ओळख यांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.