KK Shah

KK Shah सांगली | भारतीय जनता पक्ष 🚩
सेवा, विकास आणि पारदर्शकतेचं ध्येय 🙌
जनतेसाठी सदैव तत्पर !

भजन, सेवा आणि स्वच्छतेच्या माध्यमातून समाजजागृती करणारे थोर संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन.त्यांच...
20/12/2025

भजन, सेवा आणि स्वच्छतेच्या माध्यमातून समाजजागृती करणारे थोर संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन.
त्यांचे विचार व कार्य आजही प्रेरणादायी आहेत.

भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री,मा. श्री. मूकरंद भाऊ देशपांडे यांची सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपाल...
19/12/2025

भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री,
मा. श्री. मूकरंद भाऊ देशपांडे यांची सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व विशेष शुभेच्छा..!

📍अभिनंदन मा. देवेंद्रजी..मुख्यमंत्री देवाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आणखी एक गौरव!श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने दिल...
13/12/2025

📍अभिनंदन मा. देवेंद्रजी..
मुख्यमंत्री देवाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आणखी एक गौरव!

श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा बहुप्रतिष्ठित असा यावर्षीचा 'डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार - 2025' - महाराष्ट्र राज्याचे प्रगल्भ नेतृत्व, मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख जी यांच्या 127 व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात हा पुरस्कार आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंना प्रदान केला जाणार असून संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन देशमुख यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, उद्योग-व्यवसाय, शेती, सहकार, शिक्षण, दळणवळण, आरोग्य यांसह महाराष्ट्राच्या ग्रामीण-शहरी विकासासाठी, तरुणाईच्या स्वप्नातील राज्य साकारण्यासाठी आणि सर्वार्थाने सर्वच घटकांच्या उत्थानार्थ राबणाऱ्या आदरणीय देवाभाऊंना जाहीर झालेला हा पुरस्कार अवघ्या महाराष्ट्रवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदर्श नेतृत्वात प्रगत महाराष्ट्र घडत राहून, विकासाची वाट निरंतर सुरु राहो..याच शुभेच्छा!

'महाराष्ट्राचे कोहिनूर' - देवाभाऊंचे पुनश्च: अभिनंदन व शुभेच्छा!

🕯️ काळा दिवस – संसद भवन हल्ला 🇮🇳१३ डिसेंबर २००१…भारतीय लोकशाहीच्या मंदिरावर झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या अस्मितेवरच...
13/12/2025

🕯️ काळा दिवस – संसद भवन हल्ला 🇮🇳
१३ डिसेंबर २००१…
भारतीय लोकशाहीच्या मंदिरावर झालेला दहशतवादी हल्ला हा देशाच्या अस्मितेवरचा घात होता.
या हल्ल्याला परतवून लावताना मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या
तमाम शूर जवानांना कोटी-कोटी प्रणाम! 🙏🌸

त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील…
देशासाठी दिलेले प्रत्येक प्राण अजरामर आहेत. 🫡✨

🇮🇳

विद्वत्ता, साधेपणा आणि आत्मीयतेचा संगम असलेल्या भारतरत्न स्व. प्रणव मुखर्जी यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🇮🇳भार...
11/12/2025

विद्वत्ता, साधेपणा आणि आत्मीयतेचा संगम असलेल्या भारतरत्न स्व. प्रणव मुखर्जी यांना जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🇮🇳
भारतीय राजकारणातील शिस्त, दुरदृष्टी आणि शांत नेतृत्वाची तेजस्वी परंपरा त्यांनी आपल्या कार्यातून अधिक भक्कम केली. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे राष्ट्रकारभाराला नवी दिशा मिळाली.
त्यांच्या स्मृती आम्हा सर्वांना सदैव प्रेरणादायी राहोत. 🙏🌸

राष्ट्रसेवेची अखंड साधना, संघकार्याशी निष्ठा आणि आदर्श नेतृत्वाचे तेजस्वी प्रतीक—श्रद्धेय बाळासाहेब देवरस जी, राष्ट्रीय ...
11/12/2025

राष्ट्रसेवेची अखंड साधना, संघकार्याशी निष्ठा आणि आदर्श नेतृत्वाचे तेजस्वी प्रतीक—
श्रद्धेय बाळासाहेब देवरस जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🌼

त्यांची राष्ट्रनिष्ठ विचारधारा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि समाज बांधणीची दृष्टी आजही प्रेरणादायी आहे. राष्ट्रहितासाठी त्यांनी दिलेली कार्यचिन्हे प्रत्येक स्वयंसेवकासाठी मार्गदर्शक ठरतात.

🌾 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 🌾मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला मिळाली महायुती सरकारची मोठी मंजुरी!🚜 या योजनेमुळ...
11/12/2025

🌾 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 🌾
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला मिळाली महायुती सरकारची मोठी मंजुरी!

🚜 या योजनेमुळे आता शेतरस्ते तयार करण्यासाठी 100% यंत्रसामग्रीचा वापर होणार.

जागतिक मृदा दिवस!जमिनीची सुपीकता व आरोग्य हा शाश्वत शेतीचा आणि निरोगी जीवनाचा पाया आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मातीचे संर...
06/12/2025

जागतिक मृदा दिवस!

जमिनीची सुपीकता व आरोग्य हा शाश्वत शेतीचा आणि निरोगी जीवनाचा पाया आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मातीचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प करुया !

🌊🚢 भारताच्या सागरी सीमांचे सतत रक्षण करणाऱ्या धैर्यशील भारतीय नौदलाला शतशः सलाम!त्यांच्या शौर्य, शिस्त आणि त्यागामुळे आप...
04/12/2025

🌊🚢 भारताच्या सागरी सीमांचे सतत रक्षण करणाऱ्या धैर्यशील भारतीय नौदलाला शतशः सलाम!
त्यांच्या शौर्य, शिस्त आणि त्यागामुळे आपला देश अधिक सुरक्षित, समर्थ आणि अभिमानाने उभा आहे.
नौदल दिनानिमित्त सर्व जांबाज जवानांना मनःपूर्वक अभिवादन व हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳⚓

✨🙏 त्रिदेवांच्या स्वरूपातील दत्तात्रेय भगवानांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सद्बुद्धी, शांतता आणि मंगलप्रेरणा नांदो.दत्त...
04/12/2025

✨🙏 त्रिदेवांच्या स्वरूपातील दत्तात्रेय भगवानांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सद्बुद्धी, शांतता आणि मंगलप्रेरणा नांदो.
दत्त जयन्‍ती हा भक्ती, करुणा आणि आत्मज्ञान जागवणारा पवित्र दिवस—
या दिवशी दत्तत्रेयांचा आशीर्वाद प्रत्येकावर अखंड कृपाछायेप्रमाणे राहो. 🌼🕉️

श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏✨🐾

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KK Shah posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share