Avinash Kamble

Avinash Kamble Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Avinash Kamble, Aurangabad.

15/02/2026

PES Update - 041 । आंतरराष्ट्रीय परिषद २०२६

Bandhilki Social Foundation च्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी : काल, आज आणि उद्या” या विषयावर लवकरच छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.

ही परिषद पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचे शैक्षणिक, सामाजिक व कायदेशीर विश्लेषण करून संस्थेच्या भविष्यातील दिशेबाबत मार्गदर्शक विचारमंथन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे.

🎯 परिषदेची प्रमुख उद्दिष्टे :
• संस्थेच्या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास
• वर्तमान परिस्थितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण
• शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणा विषयक चर्चा
• भावी कृती आराखडा निश्चित करणे
• तज्ज्ञ, संशोधक व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

📑 संशोधन निबंध मागविण्यात येणार
आंतरराष्ट्रीय परिषद २०२६ साठी संशोधन निबंध (Research Papers) मागविण्यात येणार आहेत. सादर केलेले संशोधन पेपर्स शास्त्रीय समिक्षा (Peer Review) प्रक्रियेनंतर निवडलेल्या UGC-listed सूचीतील जर्नलमध्ये प्रकाशनासाठी विचारार्थ पाठविण्यात येतील.

प्राध्यापक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थी, कायदा अभ्यासक, हितचिंतक, सामाजिक कार्यकर्ते व सर्व संबंधित नागरिकांनी या परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहिती, नोंदणी व पेपर सादरीकरणाबाबतचे तपशील लवकरच जाहीर करण्यात येतील.

“कालचा वारसा समजून – आजची जबाबदारी पार पाडूया – उद्याचे भविष्य घडवूया.”



14/01/2026

बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून
आपण सत्य जाणून घेणं आवश्यक आहे.

हा व्हिडीओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा.

जास्तीत जास्त शेअर करा. 👇🏻

https://www.facebook.com/share/v/17MU3czegv/

14/01/2026
06/01/2026
31/12/2025
30/12/2025

PES Update - 035/04 । रत्नागिरी परिषद

दैनिक नवराष्ट्र । 29.12.2025 । छ. संभाजीनगर


थिबा कालीन बुद्ध मूर्ती रत्नागिरी येथे ज्या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहे, त्या ऐतिहासिक स्थळाला सहकारी मित्रांसोबत भेट...
27/12/2025

थिबा कालीन बुद्ध मूर्ती रत्नागिरी येथे ज्या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहे, त्या ऐतिहासिक स्थळाला सहकारी मित्रांसोबत भेट दिली. यावेळी रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश कांबळे, निहाल हाथखांबेकर तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी माहिती दिली की, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून सन 2008 पासून सदर जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावी, यासाठी शासनदरबारी कागदोपत्री पत्रव्यवहार करून सातत्याने लढा दिला जात आहे.

19/12/2025

PES Update - 035 । रत्नागिरी परिषद 14.12.25

संस्थेच्या बाय लॉजमधील कलम 18 व 19 नुसार अध्यक्षाला पदावरून काढण्याची कोणतीही तरतूद नाही. तरीही 2010 मध्ये करण्यात आलेला बनाव आणि चुकीचा नरेटिव्ह यामुळे PES चे प्रचंड नुकसान झाले. बाय लॉजचा अभ्यास न करता पसरवलेल्या वादांचा फटका संस्थेला आजही बसत आहे. रत्नागिरी परिषदेत या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यासपूर्ण व तथ्यधारीत आढावा मांडण्यात आला.

"पीपल्स एज्युकेशन सोसायटी - काल आणि आज" या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत संस्थेच्या इतिहासापासून ते आजपर्यंतच्या प्रवासावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली.

19/12/2025

PES Update - 035/01 । रत्नागिरी परिषद

रत्नागिरी येथे आयोजित परिषदेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या Bylaws मधील कलमांचा वस्तुनिष्ठ, नियमाधारित आणि कायदेशीर अभ्यास सविस्तरपणे मांडण्यात आला.

या परिषदेच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आले की, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा खरा व एकमेव आधार तिचे संविधान (Bylaws) आहे, आणि संस्थेतील सर्व अधिकार, निर्णय व कार्यपद्धती याच संविधानाच्या चौकटीत असणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे.

Address

Aurangabad

Telephone

+918888363060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avinash Kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avinash Kamble:

Share