Nisargacha Vatevar

Directions

Nisargacha Vatevar Live the passionate excitement of wildlife and our rural-tribal lifestyle with NISARGACHA VATEVAR.

International Whale Shark Day 🐋
31/08/2025

International Whale Shark Day 🐋


28/08/2025

चिमणी कावळ्यांच्या जागी आला नवा पाहुणा.🐦 LITTLE BROWN DOVE..
पूर्वी आपल्या घराच्या अंगणात रोज चिमण्या आणि कावळे दिसायचे.
पण आता त्यांची संख्या कमी झाली आहे… आणि त्यांच्या जागी आले आहेत नवे पाहुणे.
हा छोटासा व्हिडिओ आपल्याला एक गोष्ट सांगतो – निसर्ग नेहमीच आपली जागा भरून काढतो, फक्त आपण त्याला आसरा द्यायचा आहे. 🌿

👉 तुम्हालाही आपल्या अंगणात नवे पक्षी दिसले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.


🥰🌳❤️ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥰🌳❤️ #गणेशचतुर्थी  #गणेशोत्सव  #महाराष्ट्र
27/08/2025

🥰🌳❤️ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🥰🌳❤️
#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #महाराष्ट्र

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰
26/08/2025

गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥰

26/08/2025

आज सकाळी जंगल भ्रमंतीला गेलो असता,
सुंदर जांभळ्या रंगाची फुले झाडाला लागलेली दिसली. मी हे फुल पहिल्यांदाच बघत होतो त्यामुळे त्याचे फोटो काढण्या करिता झाडाजवळ गेलो.
पण नंतर लक्षात आले की ती एक वेल आहे.
तुम्हाला याचे नाव माहिती आहे का? 🌺💜🌼




23/08/2025

तपकीरी भिरभिरी | Chocolate Pansy Butterfly | फुलपाखरांच्या गोष्टी 🦋

आपल्या "फुलपाखरांच्या गोष्टी" या मालिकेत आज जाणून घेऊया एक खास फुलपाखरू – तपकीरी भिरभिरी (Chocolate Pansy) 🦋
याच्या पंखांवरचे तपशीलवार नक्षीकाम,
छुपवेशाची कला आणि शांत स्वभाव
हे खरंच निसर्गाचं एक अद्भुत सौंदर्य आहे.

👉 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत :

तपकीरी भिरभिरीचे वैशिष्ट्ये
अधिवास आणि जीवनशैली
याच्या अळीचे खाद्यपदार्थ
निसर्गातील याची विशेष भूमिका

🌿 निसर्गाशी जोडून घेण्यासाठी आणि अजून सुंदर फुलपाखरांच्या गोष्टी ऐकण्यासाठी "निसर्गाच्या वाटेवर" चॅनलला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!

#फुलपाखरांच्या_गोष्टी​ #तपकीरीभिरभिरी​ ​ ​ ​ ​
#निसर्गाच्या_वाटेवर​ ​
​ ​ ​
​ ​
​ ​
​ ​

21/08/2025

बहुरूपी फुलपाखरू – रूप बदलणारा करामती कलाकार 🦋

फुलपाखरांच्या जगातले सर्वात रोचक आणि
गमतीदार वैशिष्ट्य म्हणजे बहुरूपता.
याचं जिवंत उदाहरण म्हणजे Common Mormon – बहुरूपी फुलपाखरू.
नर नेहमी एकाच रूपात दिसतो, पण मादी तीन वेगवेगळ्या रूपात दिसते. काहीवेळा ती Common Rose तर काहीवेळा Crimson Rose या विषारी फुलपाखरांची हुबेहूब नक्कल करते.
यालाच mimicry म्हणतात – शत्रूपासून वाचण्यासाठी केलेली ही निसर्गाची विलक्षण युक्ती.

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत –
🦋 बहुरूपी फुलपाखराचे नर व मादीतील फरक
🦋 मादीची तीन वेगवेगळी रूपे
🦋 निसर्गातील mimicry चे रहस्य

अशाच अजून निसर्गकथा जाणून घेण्यासाठी ‘निसर्गाच्या वाटेवर’ या पेज ला follow करा आणि व्हिडिओला Like व Share करा. 🌿

#बहुरूपीफुलपाखरू #फुलपाखरांच्या_गोष्टी

#निसर्गाचावाटेवर

#बहुरूपी

19/08/2025

अबलख सरदार 🦋 Grey Count.
फुलपाखरांच्या राज्यातील एक शांत पण राजेशाही पाहुणा – ग्रे काऊन्ट, म्हणजेच अबलख सरदार! पंख विस्तार 60–75 मिमी, करड्या-तपकिरी पंखांवर पांढऱ्या व काळ्या रेषांची देखणी सजावट. Nymphalidae कुटुंबातील एक खास सदस्य.
भारतभर जंगल, बागा आणि सावलीदार जागांमध्ये सहज दिसणारे हे फुलपाखरू अळी बेहडा, करवंद, आवळा यांच्या पानांवर वाढते, तर मोठेपणी फुलांचा मध, झाडांचा रस आणि कुजलेल्या फळांचा गोडवा चाखते. उडताना साधे, पण निसर्गात अदृश्य होण्याची कला अप्रतिम!

अशाच आणखी सुंदर फुलपाखरांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा! 🦋

#फुलपाखरांच्या_गोष्टी


18/08/2025

कृष्णकमलिनी – रंगीबेरंगी पण विषारी फुलपाखरू 🦋 | Tawny Coaster | फुलपाखरांच्या गोष्टी 🦋

फुलपाखराच्या गोष्टी मालिकेत आज भेटणार आहोत कृष्णकमलिनी या तांबूस-केशरी रंगाच्या, पण भक्षकांना दूर ठेवणाऱ्या विषारी फुलपाखराला. वैज्ञानिक नाव Acraea terpsichore, आणि हे Nymphalidae फॅमिलीतील सदस्य आहे.
याची अळी कृष्णकमळ (Passiflora) वेलींवर उपजीविका करते आणि त्यातून विषारी द्रव्य मिळवते. त्यामुळे पक्षी याला सहसा खात नाहीत.
भारतात वर्षभर गवताळ माळरानं, बागा आणि शेताजवळ सहज दिसणारे हे सुंदर फुलपाखरू आज जाणून घ्या या छोट्याशा व्हिडिओत!

#फुलपाखराच्या_गोष्टी #कृष्णकमलिनी #मराठीव्हिडिओ


#छोटामोलारी

Address

Chandrapur
442401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nisargacha Vatevar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share