01/01/2021
नमस्कार 🙏🏻
मी मिलिंद विद्याधर कांबळी...
काही महिन्यांपूर्वी लॉकडाऊन असल्यामुळे घरात बसून काम करत असताना ऑनलाईन खुप काही शिकायला मिळालं.
खुप जणांनी ऑनलाईन बिझनेस आयडियाज शेअर केल्या व व्यवसायालाही सुरुवात केली.
व्यवसायाने मी आर्किटेक्ट आहे पण नैसर्गिक शेती व टुरिझम हे माझे पॅशन. हाच धागा पकडून नोकरी करता करता कोकणासाठी काही तरी करता यावे यावर विचार चालू होता.
मलाही वाटलं की आपलं व्यावसायिक ज्ञान, आवड, छंद एकत्रित करून आपल्या कोकणासाठी काही तरी करावं. या हेतूने मी सोशल मीडियावर नैसर्गिक शेती, पर्यटन व घरबांधणी संदर्भात मार्गदर्शन करणारे काही लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर केले आणि या संकल्पनेला कमालीचा सकारात्मक प्रतिसादही मिळाला.
आणि ह्याच प्रेरणेतून आज नवीन वर्षाच्या प्रथम दिनी THE *FARMITECT* चा जन्म झाला.
FARMIing आणि archiTECT या दोन शब्दांतून *FARMITECT* हा ब्रँड तयार झाला आहे.
दि *फार्मिटेक्ट* या ब्रँड च्या माध्यमातून व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपल्या कोकणातील लोकांसाठी नैसर्गिक शेती, घरबांधणी, व्यावसायिक बांधकाम, अग्रो टुरिझम अश्या विविध विषयांवर लेख, व्हिडिओ, वेबिनार्स आणि कार्यशाळां मार्फत मार्गदर्शन केले जाईल.
दि *फार्मिटेक्ट* चा लोगो निसर्ग (सुर्य + देशी गाय) व मानव यातील समन्वय साधतो व मुख्यतः शहरी नोकरदार वर्गाच प्रतिनिधित्व करतो.
ज्यांना नैसर्गिक शेती व शेतीपूरक व्यवसाय करून पर्यटनाच्या माध्यमातून कोकणात *शाश्वत विकास* घडवून आणायची इच्छा आहे आणि या संदर्भात वयक्तिक अथवा सांघिक पातळीवर एकत्र येऊन कोकणात काम करावयाचे असल्यास, आपण मला 9405504440 वर प्रत्यक्ष फोन करू शकता.
आणि आपल्याला ही संकल्पना आवडल्यास
दि *फार्मिटेक्ट* ला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करावे🙏🏻
https://www.facebook.com/107675771233112/posts/111027077564648/
https://www.youtube.com/channel/UCG7smvT0TDOk_x4tW0UxGew