BLESS

BLESS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BLESS, Construction Company, Powai, Mumbai.

आज जागतिक प्लंबिंग दिवस आहे त्यानिमित्ताने सध्याच्या घरातील अत्यावश्यक घटक असणाऱ्या plumbing system बद्दल थोडी माहिती घे...
13/03/2024

आज जागतिक प्लंबिंग दिवस आहे त्यानिमित्ताने सध्याच्या घरातील अत्यावश्यक घटक असणाऱ्या plumbing system बद्दल थोडी माहिती घेऊया.

आत्ता अगदी वाडी वस्तीवर सुद्धा RCC घर बांधलं जातय. 25-30 वर्षा पुर्वी पर्यंत संडास बाथरूम घरात नको. संडास घरापासून थोडे लांब आणि बाथरूम शेवटच्या भिंतीनंतर असे नियम खेडेगावात होते. अजुनही आहेत.

पण आता बहुतांश घरात WC Bathroom आर्किटेक्ट प्लॅनिंग नुसार काही वेळेस वास्तुशास्त्रानुसार असते. WC Bathroom मध्ये टाइल्स कोणत्या लावायच्या, बाथरूम मधील CP Sanitary fittings भारी डिझाईन चे घ्यायचे याबाबत जोरदार चर्चा असते. या सर्वात दुर्लक्षित भाग राहतो तो plumbing piping.

या पोस्ट सोबतचा फोटो पहा. बांधकाम पूर्ण करून त्याचा क्युरींग पिरियड पूर्ण झाल्यानंतर plumbing piping करावे. प्लास्टर करण्या अगोदर या piping चे प्रेशर टेस्ट करून घ्यावे. जॉइंट मधून leakage नाही याची खात्री करून घ्यावी आणि नंतरचं प्लास्टर करावे. पाईप बसवण्यासाठी भिंती मध्ये जे खाचकम केलेले असते ते आधी भरून घ्यावे. construction केमिकल्स तयार करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी आत्ता यासाठी विशिष्ठ मिश्रण तयार केली आहेत. पाईप भोवतीचा भाग या मिश्रणाने भरावा.

सध्या plumbing piping साठी UPVC, CPVC आणि SWR पाईप उपयोगात आणले जातात. Supreme, Ashirwad, Phinolex, Astral, Prince, Wavin अशा विविध कंपन्या असे पाईप तयार करतात. असे पाईप खरेदी करताना ISI मार्क जरूर तपासावा.

WC Bathroom मध्ये plumbing piping आणि water proofing या कामाकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये नाहीतर आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. या दोन वेगवेगळ्या एजन्सी असतात आणि प्रत्येकाला आपले काम संपवून जायचे असते. या घाई गडबडीत कामाच्या दर्जा कडे दुर्लक्ष होते. भिंतीवरील plumbing piping आणि outlet साठी करावी लागणारी तोडफोड पूर्ण झाल्याशिवाय waterproofing ला सुरूवात करूच नये.

Waterproofing नेहमी डब्बल लेअर असावे. म्हणजे स्लॅब चा जो भाग आहे त्याला सुरुवातीलाच chemical waterproofing करून घ्यावे. इथे एकदा water ponding टेस्ट करावी. ही टेस्ट successful झाल्यानंतर ह्या केमिकल लेअर वर प्लास्टर करून या लेअर ला सुरक्षित करावे आणि त्यानंतरच आउटलेट piping चे काम करावे. या नंतर मग brickbat coba, concrete coba आणि टॉप लेअर केमिकल वॉटर प्रूफिंग.

Plumbing piping मध्ये होणारी RCC member ची तोडफोड जी मुख्यतः आउटलेट piping साठी केली जाते ती आपण टाळू शकतो. यासाठी घराचा प्लॅन तयार करताना आर्किटेक्ट इंजिनिअर कडून plumbing डिटेल्स सुद्धा तयार करून घ्यावेत आणि स्लॅब भरत असताना प्रस्तावीत आउटलेट च्या जागी sleev टाकावी म्हणजे पुढे जावून RCC Beam, Slab मध्ये तोडफोड करायची गरज लागणारं नाही.

बाथरूम वॉल वर ज्या टाईल्स आपण फिक्स करणार आहोत त्यांचं selection हे Plumbing piping सुरू करण्या अगोदर करावे. विशेषत: टाइल्स ची size आणि design pattern. आपल्या CP fittings चे विशेषत: shower panel चे position नुसार piping करावे लागते. नाहीतर tile joints आणि या CP fittings ची लाईन मॅच करत नाही. Plumbing piping ची सुरुवात करण्या अगोदर selection झालेल्या टाइल्स ची मार्किंग भिंतीवर करावी आणि आर्किटेक्ट कडून चेक करून घ्यावे.

Er. Vidyanand Gavade

[email protected]

Repair & Restoration of Hotel Balaji, Khed, Dist. Ratnagiri.Not a very old building but bcoz of poor workmanship got maj...
14/10/2023

Repair & Restoration of Hotel Balaji, Khed, Dist. Ratnagiri.

Not a very old building but bcoz of poor workmanship got major leakage issues.

Now applying thorough civil engineering practices to get it restored to a new look.



#दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकाम

Er. Vidyanand Gavade
[email protected]

 #दर्जेदार_मजबूत_इमारत_बांधकाम खंडाळ्यासारख्या ठिकाणी टेरेस स्लॕब मधून जराही लिकेज नाही. काँक्रिट मध्ये योग्य केमिकल्स च...
16/07/2023

#दर्जेदार_मजबूत_इमारत_बांधकाम



खंडाळ्यासारख्या ठिकाणी टेरेस स्लॕब मधून जराही लिकेज नाही. काँक्रिट मध्ये योग्य केमिकल्स चा उपयोग आणि चांगलं लेबर वर्क यामुळे हे शक्य झालय. प्लास्टीसायझर च्या वापरामुळे काँक्रिट चा एकजिनसीपणा वाढला. काँक्रिट सहजतेने पसरवता याव यासाठी त्यामध्ये पाण्याच प्रमाण थोड वाढवण्याकडे कामगारांचा कल असतो. पण हे वाढीव पाणी काँक्रिट साठी चांगलं नसत. प्लास्टीसायझर च्या वापराने पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यास मदत होते आणि काँक्रिट सहजतेने पसरवण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. यासोबतच आम्ही काँक्रिट तयार करताना integral waterproofing compoun वापरले.

शटरिंग प्लेट मधील गॕप 4" च्या खाकी टेप ने बंद करण्याचा प्रयोग याआधी वेगवेगळ्या साईट वर केला होता. पण खंडाळ्यामधील पावसाचे प्रमाण पाहता संपूर्ण शटरिंग प्लॕस्टीक पेपर ने कव्हर केले आणि त्यानंतर स्टील बांधले. या प्लॕस्टीक मुळे सिमेंट स्लरी खाली वाहून गेली नाही. यामुळे काँक्रिट चा दर्जा टिकून राहण्यास मदत झाली.

शटरिंग मटेरियल च्या जाॕईंट मधून वाहत जाणारी स्लरी लिकेज ला संधी देते अस माझ निरीक्षण आहे. म्हणून थेट मुळावरच घाव. जाॕईंट मधून सिमेंट स्लरी ला अजिबातच वाट मिळणार यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली.

अजून या टेरेस स्लॕब वर वाॕटरप्रूफिंग ट्रिटमेंट करायची आहे. मुळ स्लॕब मधून कोणत्याही प्रकारे लिकेज, डॕम्पनेस नसल्यामुळे वाॕटरप्रूफिंग ट्रिटमेंट ही एक अधिकची काळजी extra care असणार आहे.

मे महिन्यात व्हिजिट केली तेव्हा क्लायंट आणि काँट्रॕक्टर या दोघांनाही समोरासमोर बसवून या बाबतीत तपशीलवार चर्चा केली होती आणि त्याचे उत्तम रिझल्ट मिळाले.

या पोस्ट मध्ये नमुद केलेल्या पद्धतीने स्लोपिंग स्लॕब चे काँक्रिट केल्यास उत्तम रिझल्ट मिळू शकतात.

कन्स्ट्रक्शन केमिकल तयार करणाऱ्या जवळजवळ सर्वच कंपन्या उदा. Sika, Fosroc, BASF, MAPEI, Sunanda, Dr. Fixit, MYK Laticrete, Choksey प्लास्टीसायझर तयार करतात. मागील दोन वर्षात अल्ट्राटेक या आघाडीच्या सिमेंट उत्पादक कंपनीने असे विविध केमिकल्स ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. JSW, ACC या सिमेंट कंपन्यांनी सुद्धा असे केमिकल्स बाजारात आणले आहेत.

इंजि. विद्यानंद गावडे
B. E. Civil
ervidyanandgavade@gmail.

  #दर्जेदार_आणि_मजबूत_घरबांधणीभाग 16पावसाळा संपत आलाय, जवळपास संपलाय. आता पुन्हा घराच काम सुरू करायचं म्हणतो. खरतर एकच म...
16/10/2022


#दर्जेदार_आणि_मजबूत_घरबांधणी
भाग 16

पावसाळा संपत आलाय, जवळपास संपलाय. आता पुन्हा घराच काम सुरू करायचं म्हणतो. खरतर एकच मजला म्हणजे ग्राऊंड फ्लोअर तेव्हढाच बांधायचा होता. पावसाळ्यात जमेल तस आतील काम करून दसरा दिवाळीला वास्तुशांती करायची अस नियोजन होत.

पहिला स्लॕब झाल्यानंतर अचानक घरच्यान वाटू लागल कि अजून एक मजला असावा. गावात दुमजली घर पाहिजे. बजेट ची तरतूद नव्हती. आपल्यापैकी खुपजणांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात. अशावेळी सावधपणे पावल टाकायची. म्हणून ठरवल कि थोड थांबू. पावसाळ्यानंतर सुरू करू.

नशीब एवढ चांगलं कि सेंट्रींगवाल्याच किंवा इतर कुणाच न ऐकता या छोट्याश्या घराच आरसीसी डिझाईन सिव्हिल इंजिनियरकडून करून घेतल होत. पुन्हा त्यांना विचारून खात्री केली आणि वरच्या मजल्याच आरसीसी काम पूर्ण केल.

पहिल्या वेळी झालेल्या काही चुका सुधारल्या. ज्यांच्या कडून डिझाईन करून घेतल होत त्यांना व्हिजिट साठी बोलावल. हा स्लॕब नक्की वाॕटरप्रूफ झालाय अशी खात्री वाटते. इंजिनियरच सतत लक्ष असल्यामुळे सेंट्रींग कामगारांनी अधिक काळजीपूर्वक काम केल.

शटरिंग खोलल्यानंतरच हे फिनीशिंग बघा. चांगल्या कामाची आपल्याला खात्री वाटेल. आपल्यालाही असे उत्तम घर बांधायचे असेल तर माझ्या अनुभवावर आधारित भाग 1 ते 15 नक्की वाचा.

इथूनपुढे घराच काम पुर्ण करण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत त्याबाबत नियमित लिहित जाईन. नक्की वाचा.

घराच इलेव्हेशन सुद्धा छान करायच ठरवलय.

इंजि. विद्यानंद गावडे.
B. E. Civil

  #मजबूत_आणि_दर्जेदार_इमारत_बांधकामभाग 15स्लॕब भाग 3स्लॕब साठी नेमकी काय तयारी करायची याची माहिती मागील दोन भागापासून आप...
07/05/2022


#मजबूत_आणि_दर्जेदार_इमारत_बांधकाम

भाग 15
स्लॕब भाग 3

स्लॕब साठी नेमकी काय तयारी करायची याची माहिती मागील दोन भागापासून आपण घेत आहोत. शटरिंग आणि स्टील बांधून पूर्ण झाल्यानंतर आपल्या आरसीसी डिझायनर ना व्हिजीट साठी बोलवावे. ही व्हिजीट शक्यतो स्लॕब भरणीच्या दोन दिवस आधी व्हावी. स्लॕब ची जाडी, बीम ची साईज, या दोन्ही मध्ये बांधले गेलेले स्टील आधी दिलेल्या ड्राॕईंग प्रमाणेच आहे याची खात्री यांच्याकडून करून घ्यावी. काही राहीले असल्यास सेंटरींग काँट्रॕक्टर कडून ते दुरूस्त करून घ्यावे.

ग्रामीण भागात एक विचित्र पद्धत अजूनही बघायला मिळते. अगदी स्लॕब काँक्रिटींग सुरू होई पर्यंत स्टील ची बांधणी सुरूच असते. काही ठिकाणी तर बीम ची साईड लावायचे कामही सुरू असते. या सगळ्या गोष्टी दोन दिवस आधी पूर्ण व्हायला हव्यात.

पोस्ट सोबतच्या फोटो मध्ये स्लॕब च काम सुरू असलेल बघू शकता. मशीन मध्येच काँक्रीट मिक्स कराव. काँक्रिट वरती चढवण्यासाठी लिफ्ट आहे ही उत्तम गोष्ट. ही लिफ्ट अगोदरच्या दिवशीच बांधलेली योग्य.

स्लॕब भरणी दिवशी संपूर्ण लक्ष हे काँक्रीट वर असाव.

सदरच्या फोटो मध्ये आपण पाहू शकतो कि काँक्रिट मधील घटक म्हणजे खडी आणि वाळू बुट्टीने - पाटीने मिक्सर मध्ये टाकले जात आहेत. हे अत्यंत चुक आहे. विशेष म्हणजे या पाट्या मोजताना कुणीच दिसत नाही. यापेक्षा सव्वा घनफुटाचा फर्मा वापरावा. यानेच योग्य प्रमाणित काँक्रिट तयार होऊ शकत. पाणी सुद्धा मोजून वापरावे.

या साईटवर अजून दोन चूका दिसून आल्या.

इथे वापरली जात असलेली खडी ही पावणा इंची या एकाच प्रकारातील आहे. खरतर अर्धा इंची आणि पावणा इंची खडी 50 - 50% याच प्रमाणात वापरावी. योग्य पद्धतीचे काँक्रिट तयार होण्यास यामुळे मदत होते. मोठी खडी वापरल्यामुळे काँक्रिट ची ताकत वाढते अस जर तुम्हाला कुणी सांगितलं असेल तर ते चुकीच आहे. उलट यामुळे काँक्रिट पसरवताना कामगारांना त्रास होतो आणि त्यामुळे ते कामात चालढकल करतात.

दुसरी चूक म्हणजे मे महिन्यातील भर दुपारी काँक्रिटचे काम चालू होते. तरीही खडी वर अजिबात पाणी मारले जात नव्हते. यामुळे वाॕटर सिमेंट रेषो बिघडण्याची शक्यता वाढते.

इमारत मालकांनी सर्व घटकांच योग्य प्रमाण इंजिनियर कडून समजून घ्याव आणि कामगारांच्याकडून त्याप्रमाणेच काम करून घ्याव. पुन्हा एकदा सांगतो.. जर तुम्ही आरसीसी बांधकामातील नियम काटेकोरपणे पाळत नसाल तर तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे अक्षरशः वाया घालवताय. अस होऊ न देण्यासाठी जाणकार, अनुभवी आणि तज्ञ इंजिनियर च मार्गदर्शन घ्यायला विसरू नका.

क्रमशः
इंजिनियर विद्यानंद गावडे
B. E. Civil

  #दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकामभाग 14 #स्लॕब_भाग_2स्लॕब संबंधित पहिल्या भागात आपण बाघितल कि आपल्या इमारतीचे आरसीसी ड...
24/04/2022


#दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकाम

भाग 14

#स्लॕब_भाग_2

स्लॕब संबंधित पहिल्या भागात आपण बाघितल कि आपल्या इमारतीचे आरसीसी डिझाईन तज्ञ आणि अनुभवी सिव्हिल इंजिनियर कडून करून घेण किती महत्त्वाच आहे.

या भागात आपण आरसीसी काँट्रॕक्टर ची निवड आणि शटरिंग साहित्य बाबत माहिती घेऊया. आपल्या इमारतीचा आर्किटेक्चरल प्लॕन, इलेव्हेशन आणि आरसीसी डिझाईन सोबत घेऊनच आरसीसी बांधकामाचे रेट ठरवावेत. नाहीतर नंतर मेजरमेंटच्या पद्धतीवरून घोळ आणि वाद ठरलेलाच. ज्यांना काँट्रॕक्ट द्यायचं आहे त्या काँट्रॕक्टर ची सध्या चालू असलेली कामे प्रत्यक्ष बघावित. यावेळी कामगार किती आहेत याचा अंदाज घ्यावा. आर्किटेक्ट, इंजिनियर यांचा त्या एजन्सी बाबतच पुर्वानुभव विचारावा. त्यांच्याकडे किती शटरिंग साहित्य आहे याची माहिती घ्यावी. त्यांनी पूर्ण केलेली कामे वेळेत पूर्ण केली आहेत का त्याची आवर्जून चौकशी करा. सगळी खात्री पटल्यानंतरच काम द्या.

स्लॕब शटरींग साठी लोखंडी प्लेट ना प्राधान्य द्या. बहुमजली इमारतींसाठी कोटेड प्लायवूड योग्य. बीम बाॕटम आणि साईड साठी सुद्धा प्लायवूडच वापरा. दोन प्लेट किंवा प्लायवूड मधील गॕप खाकी टेपने बंद करा. या सगळ्यामुळे काँक्रिट मधील सिमेंट स्लरी शोषली जाणार नाही आणि वाया जाणार नाही. फाॕर्म फिनिश स्लॕब सरफेस मिळण्यास यामुळे मदत होते. पुढे जाऊन प्लास्टर चा खर्च वाचवला जाऊ शकतो. सिमेंट स्लरी टिकून राहिल्यामुळे स्लॕब काँक्रिट मधील तळाच्या भागाची ताकत टिकून राहते. भविष्यातील देखभाल दुरूस्तीचा खर्च कमी होतो. इमारतीचे आयुष्यमान वाढते.

15-20 वर्षापूर्वीपर्यंत ग्रामीण भागात स्लॕब साठी लाकडी फळ्या वापरण्याची पद्धत होती. आता प्रमाण खुपच कमी झालय. लाकडी फळी मध्ये सिमेंट स्लरी शोषली जाते. त्यामुळे काँक्रिट फिनिशींग दिसत नाही आणि ती लाकडी फळी पुन्हा उपयोगात ही आणता येत नाही. शटरिंग सपोर्ट साठी लोखंडी प्राॕप्स वापरण योग्य. उपलब्धता नसल्यास बांबू आणि लाकडी साहित मजबूत असल्याची खात्री करून घ्यावी. एखाद्या कामगाराला विचारून आणि प्रत्यक्ष पाहून खात्री करावी. या बांबू किंवा प्राॕप्स ना क्राॕस सपोर्ट देण सुद्धा जरूरी आहे.

काँक्रिट सुरू करण्या अगोदर कामगारांना चालण्यासाठी रस्ता तयार करावा. निडल व्हाब्रेटर आणि लेव्हलिंग साठी आवश्यक इतर साहित्य तयार ठेवावे. काँक्रिट ची वाहतुक करणाऱ्या कामगारांव्यतिरिक्त लेव्हल नुसार काँक्रिट पसरवणारे, निडल व्हायब्रेटर चालवणारे, काॕक्रिट लेव्हल करणारे आणि फिनिश करणारे असे सगळे कामगार वेगवेगळे असावेत. तरच सगळे नियम पाळून काँक्रिटींग यशस्वीपणे करता येते. नेमक्या याच बाबतीत काँट्रॕक्टर आणि कामगारांच्याकडून हलगर्जीपणा होतो. वेगवेगळे कामगार ठेवण्यास टाळाटाळ केली जाते. यावर मालक आणि इंजिनियर यांनी ठामपणे नियंत्रण ठेवावे

Er. Vidyanand Gavade
[email protected]

  #दर्जेदार_आणि_मजबूत_बांधकामHow a civil engineer can contribute to save this planet ??आज  #जागतिक_वसुंधरा_दिवस  या दिवश...
22/04/2022


#दर्जेदार_आणि_मजबूत_बांधकाम

How a civil engineer can contribute to save this planet ??

आज #जागतिक_वसुंधरा_दिवस

या दिवशी आणि अशाच इतर ही दिवशी खुप पोस्ट सोशल मिडियावर बघायला मिळतात. या सगळ्यांचा उद्देश एकच असतो -- आपापल्या व्यवसायाच मार्केटींग. उद्देश काही वाईट नाही. पण त्यासोबतच तो ठराविक दिवस जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्या पाठीमागे नेमकं कारण काय, मुळ उद्देश काय याचा शोध फारच कमीवेळा घेतला जातो. आज एक सिव्हिल इंजिनियर म्हणून या धरणी मातेकडे बघण्याचा प्रयत्न करणार आहे.

बांधकाम कोणत्याही प्रकारच असो, त्यासाठी लागणार सर्व प्रकारच साहित्य हे निसर्गातूनच मिळत. माती, दगड, पाणी, स्टील, सिमेंट, कन्स्ट्रक्शन केमिकल्स, वाळू, खडी, लाकूड, डांबर.. सर्व काही. या सर्व गोष्टी आज ना उद्या संपणार. म्हणून त्या पूरवून पूरवून वापरायला हव्यात. पण मानसाची भौतिक विकासाची हाव एवढी प्रचंड आहे कि तो पुढील पिढीसाठी काही शिल्लक ठेवेल अस वाटत नाही.

मग यावर उपाय काय ??

पहिला उपाय
दिर्घकाळ टिकणारे बांधकाम. यासाठी दर्जेदार साहित्याचा उपयोग करायला हवा. कारागिरी चांगली हवी. बांधकामाचे सर्व शास्त्रीय नियम पाळायला हवेत. डिझाईन करताना आणि प्रत्यक्ष बांधकाम करताना घेतलेल्या काळजीमुळे भविष्यात बांधकामाच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च कमी करता येऊ शकतो.

दुसरा उपाय..
वेळेवर देखभाल दुरूस्ती. यामुळे बांधकामाच आयुष्यमान टिकून राहण्यास मदत होईल.

तिसरा उपाय..
गरज असेल तेव्हढेच बांधकाम. शासकीय आणि सार्वजनिक प्रकल्पांना हा उपाय जास्त लागू पडतो. निवडणूकीत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी गरज नसलेले किंवा कमी गरजेचे प्रोजेक्ट केले जातात. यावर निर्बंध हवेत

चौथा उपाय..
ग्रीन मटेरियल चा उपयोग

उदा.
मातीच्या विटांऐवजी एएसी ब्लाॕक बांधकामासाठी वापरणे.
ओपीसी सिमेंट ऐवजी ब्लेंडेड (पीपीसी पीएससी) सिमेंट वापरणे.

एएसी ब्लाॕक्स हे फ्लाय ॲश पासून तयार केले जातात. ब्लेंडेड सिमेंट मध्ये फ्लाय ॲश आणि सिमेंट स्लॕग वापरतात.

विजनिर्मितीसाठी जाळल्या जाणाऱ्या दगडी कोळश्याच वेस्ट म्हणजे फ्लाय ॲश. ही अशीच टाकून दिली तर पर्यावरणासाठी अतिशय घातक. लाल विटा तयार करण्यासाठी जी माती वापरली जाते ती शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते.

नदीच्या वाळू ऐवजी कृत्रीम वाळू वापरणे

रस्त्याच्या बांधकामात टाकाऊ प्लास्टीक चा उपयोग करणे

पाचवा उपाय
इमारत असो किंवा इतर प्रकल्प, यांचे शास्त्रीय डिझाईन तयार करणे आणि बांधकामाचे उत्तम नियोजन करणे. बांधकामाच्या दर्जावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे.

हे सर्व उपाय अमलात आणून आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा चांगला उपयोग optimum use करू शकतो आणि आपल्या या पृथ्वीच आरोग्य जपण्यासाठी हातभार लावू शकतो. हे उपाय नवीन नाहीत. पण अमलबजावणीत प्रचंड उदासिनता आहे.

Er. Vidyanand Gavade
B. E. Civil
[email protected]

  #दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकामभाग 14 #स्लॕब  भाग 1इमारत बांधकामातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण ॲक्टीव्हिटी म्हणजे स...
18/04/2022


#दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकाम

भाग 14

#स्लॕब भाग 1
इमारत बांधकामातील सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण ॲक्टीव्हिटी म्हणजे स्लॕब. पायापासून सुरू झालेला हा कष्टप्रद प्रवासाचा एक मोठा टप्पा स्लॕब भरल्यानंतर संपतो. ज्या दिवशी स्लॕब भराईच काम पूर्ण होत त्या दिवशी अगदी साग्रसंगीत, जंगी पार्टी असते यावरून या गोष्टीच महत्व अधोरेखीत होत. पण या पार्टीच्या नादात खुप महत्वपूर्ण गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. एकदाच, काहीही करून स्लॕब भराईच काम पूर्ण होऊ देत यासाठी घरमालक आणि सेंटरींग काँट्रॕक्टर देव पाण्यात घालून बसलेले असतात अस म्हटल तर वावग ठरू नये. पण हेच दोन लोक आणि भराईची गँग असे तिघे मिळून काँक्रिट मधील सिमेंट आणि पाण्याच्या प्रमाणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. त्यामुळे नंतर देव ही प्रसन्न होत नाही. म्हणून स्लॕब भरण्या अगोदर, स्लॕब भरणी चालू असताना आणि स्लॕब भराई पूर्ण झाल्यानंतर लगेचच काळजी घेण गरजेच आहे नाहीतर आयुष्यभर मनस्ताप ठरलेला. नक्की काय काळजी घ्यायची ते या आणि पुढील लेखात पाहूया.

सर्वप्रथम एक गोष्ट आवर्जून सांगतो ती म्हणजे तुमच्या इमारतीचे #आरसीसी_डिझाईन तज्ञ सिव्हिल इंजिनियर / स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याकडूनच तयार करून घ्या. हे डिझाईन घर बांधणीला सुरूवात होण्या अगोदर करून घ्यायचं असत, स्लॕब बांधण्याच्या वेळी नव्हे हे ही लक्षात घ्या. अस डिझाईन न घेता जेव्हा आपण आरसीसी इमारत बांधतो तेव्हा एकतर स्टील जास्त वापरल जात किंवा कमी. दोन्हीही मध्ये नुकसान घरमालकाचच आहे. स्टील गरजेपेक्षाजास्त वापरल गेल्यास खर्च वाढतो आणि नियमापेक्षा कमी वापरल गेल्यास इमारत कमकुवत होऊन तिचे आयुष्यमान कमी होते, दुरूस्ती देखभालीचा खर्च वाढतो. म्हणजेच एक प्रकारे आपण आपल्या कष्टाचा पैसा वाया घालवतो.

स्लॕब साठी स्टील, खडी, वाळू, सिमेंट अशी मटेरियल्स लागतात तसच सेंटरिंग शटरिंग कामगार, स्टील बांधणारे कामगार, काँक्रिट मिक्स करणाऱ्या मशीन्स, वाहतुक करण्यासाठी कामगार लागतात. काँक्रिट ओतणे, पसरवणे, पसरलेल्या काँक्रिट ला व्हायब्रेशन देऊन व्यवस्थित लेव्हल करणे, फिनीश करणे या छोट्या छोट्या कामांसाठी वेगवेगळे कामगार लागतात. या सर्वांच योग्य नियोजन झाल्याशिवाय स्लॕब काँक्रिट भरण्याची घाई करू नये. मुहूर्ताची घाई तर अजिबातच नको.

खडी दोन प्रकारची वापरावी. 12 mm अर्धा इंची आणि 20 mm पावणा इंची. या दोन्हीही खडीँचे प्रमाण निम्मे निम्मे असावे. ही खडी काँक्रिट मध्ये मिक्स करण्याआधी पाण्याने भिजवून घ्यावी. स्लॕब साठी वापरली जाणारी वाळू अगदीच पिठी साखरे सारखी बारीक किंवा एकदमच जाडीभरडी नसावी. सिमेंट फ्रेश असावे. आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो तेच काँक्रिट तयार करण्यासाठी वापरावे. कोणत्या ग्रेड चे काँक्रिट तयार करायचे आहे आणि त्यासाठी सिमेंट खडी वाळू पाणी केमीकल यांचे प्रमाण काय ही माहिती इंजिनियर कडून घ्यावी.

क्रमशः
इंजि. विद्यानंद गावडे
B. E. Civil
[email protected]

आजच्या जागतिक आरोग्य दिना निमित्तानं सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा.चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी संतुलित आणि चौरस आहार घ्य...
07/04/2022

आजच्या जागतिक आरोग्य दिना निमित्तानं सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा.
चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी संतुलित आणि चौरस आहार घ्या, नियमित व्यायाम करा. वर्क लाईफ बॕलन्स सांभाळा. मानसिक आरोग्यासाठी एखाद्या चांगला छंद जोपासा, योग ध्यान धारणा करा. कुटूंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक यांना वेळ द्या. एवढी काळजी घेऊनही काही त्रास जाणवलाच तर ताबडतोब तज्ञ डाॕक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या. हलगर्जीपणा करून नका. वाढत्या वयोमानानुसार आवश्यक त्या चाचण्या करा. आरोग्य विमा काढायला अजिबात विसरू नका.

वैयक्तिक आरोग्याप्रमाणेच आपल्या इमारतीच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरू नका. Precaution is always better than cure अशी एक म्हण वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध आहे. हीच गोष्ट तंतोतंत बांधकाम क्षेत्राला लागू आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतरची देखभाल दुरूस्ती ही खर्चिक, वेळखाऊ आणि काही वेळेस मनस्ताप देणारी असते. त्यामुळे बांधकाम सुरू असतानाच बांधकामविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे केव्हाही चांगलं.

या पोस्ट सोबतचा पहिला फोटो पहा. ग्राऊंड फ्लोअरलाच काॕलम ची पोझिशन चुकलेय. त्यामुळे स्टील ला बेंड मारण्याची वेळ आलेय. तो बेंड ही दुर्दैवाने नियमाप्रमाणे मारलेला नाही. आपल्या इमारतीचे आरसीसी स्ट्रक्चर आपण स्वतःच कमकुवत करत आहोत. या अशा चुका टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची याची माहिती अगदी पहिल्या पोस्ट पासून दिलेली आहे.

या अशा चुका टाळण्यासाठी अनुभवी इंजिनियरच्या दैनंदिन देखरेखीमध्ये आपल्या इमारतीच बांधकाम व्हायला हव. एवढी काळजी घेऊनही काही चुका झाल्याच तर त्या आयएस कोडच्या मार्गदर्शक सुचनानुसार दुरूस्त करता येतात. पण जर दुरूस्त झाल्या नाहीत तर इमारतीच आयुष्यामान निम्म्यान कमी होत हे नक्की. सोबतच देखभाल दुरूस्तीचा खर्च वाढतो.

आरसीसी बांधकाम तंत्रज्ञान ही आधुनिक विज्ञानाची देणगी आहे. आपल्या भारतीयांचा सहभाग यामध्ये फार कमी आहे. आपण एंड युजर आहोत. त्यातही आपण नियमात पळवाट शोधतो आणि बांधकामाचे आरोग्य बिघडवून टाकतो.

काळजी घ्या

Vidyanand Gavade
B. E. Civil
[email protected]


#दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकाम

B. E.  #दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकामभाग 12आरसीसी बांधकामातील एका खुप छोट्या घटकाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हा घ...
26/03/2022

B. E.

#दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकाम
भाग 12

आरसीसी बांधकामातील एका खुप छोट्या घटकाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. हा घटक आकाराने खुप छोटा असला तरी त्याच महत्त्व खुप मोठ आहे. आरसीसी बांधकामातून हा घटक वगळला तर ते आरसीसी बांधकाम होऊच शकत नाही एवढा हा घटक महत्वपूर्ण ... #कव्हर, #स्टील_कव्हर, #काँक्रिट_कव्हर... नाम तो सूना ही होगा. अब काम जान लो.

या कव्हर च काम आहे आरसीसी बांधकामातील स्टील च संरक्षण करण. कव्हर म्हणजे नेमक काय ?? अगदी सोप्या शब्दात आवरण. नव पुस्तक घेताच त्याला आपण कव्हर घालतो. एक नव आवरण चढवतो. पुस्तक लवकर खराब होऊ नये, त्या पुस्तकाच नवेपण टिकून रहाव, आयुष्यमान वाढाव हा उद्देश. अगदी याच धर्तीवर स्टील ला कव्हर दिली जाते.

काँक्रिट चा बाह्य पृष्ठभाग आणि स्टील चा बाह्य पृष्ठभाग यामध्ये विशिष्ट अंतर असण गरजेज असत. या अंतरालाच कव्हर म्हणतात. आरसीसी बांधकामातील विविध मेंबर जसे कि काॕलम, बीम, स्लॕब, फुटींग, वाॕल यासाठी किती कव्हर असावी यासाठी वेगवेगळे नियम आहेत. 15 mm ते 75 mm अशी विविधता आहे. प्लींन्थ लेव्हलच्या खालील आरसीसी काम आणि प्लीन्थ लेव्हलच्या वरील आरसीसी काम यावर सुद्धा कव्हर चे नियम ठरतात. हे नियम कसोशीने आणि अगदी काटेकोरपणे पाळण आपल्या इमारतीच्या आयुष्यमानासाठी चांगलं असत.

रिच सिमेंट माॕर्टर आणि एफआरपी पासून तयार केलेल्या विविध साईज आणि आकारातील कव्हर आता मार्केट मध्ये सहज उपलब्ध आहेत. याचाच वापर करावा. फरशीचे तुकडे, पावणा इंची खडी यांचा वापर करून कव्हर देऊ नये. अजून एक भयानक शाॕर्टकट मारला जातो.. विशेषतः स्लॕब चे काँक्रिट करताना. काँक्रिट सुरू असतानाच स्टील ची जाळी थोडीशी उचलून त्याखाली काँक्रिट घातले जाते. पण यामुळे सगळीकडे एकसारखी कव्हर मिळण्याची शक्यता कमी होते. बायंडीग वायरने एकमेकांशी बांधलेले बार सैल होतात. या गडबडीत बीम ची कव्हर तुटते. मध्येच काँक्रिट थांबवण्याची वेळ येते.

कव्हर व्यवस्थित लावली असेल तर स्टील जाळीच्या भोवतीने काँक्रिट व्यवस्थित होत. कव्हर नसेल तर काँक्रिट मधील वाळू सिमेंट च मिश्रण ज्याला इंजिनियरिंग भाषेत स्लरी म्हणतात ते कसबस स्टील भोवती पसरत. पण या अशा मिश्रणात खडी अजिबातच नसल्यामुळे ते कमकुवत असत आणि कालांतराने पडायला सुरूवात होते आणि त्यामुळे स्टील चा बाह्य वातावरणाशी संबंध येतो. इथूनच स्टील गंजण्याची प्रक्रिया सुरू होऊन आरसीसी मेंबर ची ताकत कमी होऊ लागते.

पुरेशी कव्हर न मिळालेल्या स्टील ला प्लास्टर करून झाकून टाकणे हा उपाय नव्हे. ती झाली पळवाट. काँक्रिट आणि स्टील जसे एकमेकांशी घट्ट जोडले जातात तस प्लास्टरच नसत. ते कालांतराने निघून पडत.

कव्हर शिवाय आरसीसी बांधकाम होऊच शकत नाही आणि झाल तरी ते फारकाळ टिकत नाही एवढं इथे नमूद करू इच्छितो.

क्रमशः

विद्यानंद गावडे
B. E. Civil
[email protected]

B. E.   #दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकामभाग 11 स्टील 3स्टील हा आरसीसी बांधकामातील खुप महत्वपूर्ण घटक आहे. स्टील च्या वा...
12/03/2022

B. E.

#दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकाम
भाग 11 स्टील 3

स्टील हा आरसीसी बांधकामातील खुप महत्वपूर्ण घटक आहे. स्टील च्या वापरामुळेच काँक्रिट च्या बांधकामाला आरसीसी म्हणतात. विविध आरसीसी मेंबर - फुटींग, काॕलम, बीम, स्लॕब स्टेअरकेस मध्ये कोणकोणत्या डायमीटरचे स्टील बार वापरायचे हे आपल्याला आरसीसी डिझायनर कडून समजत. या डिटेल्स प्रमाणे किती किलो स्टील लागेल ते प्रोजेक्ट इंजिनियर आपल्याला सांगेल.

त्यानंतरच महत्त्वाच काम म्हणजे ड्राईंग आणि मेजरमेंटनुसार स्टील कटींग, योग्य ठिकाणी बेंड आणि मग योग्य जागी बांधणी. हे काम आरसीसी काँट्रॕक्टर कडील कामगार करतात. हे प्रचंड शारीरिक मेहनतीचे काम आहे. मुंबई पुण्यासारख्या महानगरातील बांधकाम साईटवर यासाठी स्वतंत्र टीम असते. या शारीरिक मेहनतीला कंटाळून काही वेळेस या कामात शाॕर्टकटस मारले जातात. याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते आपण पहिल्या फोटो मध्ये बघू शकता.

अशा शाॕर्टकटस ची काही उदाहरण सांगतो
1) स्टीरप्स म्हणजे रिंग पुरेशा प्रमाणात न बांधणे
2) काॕलम चे बार एकमेकाला बांधताना पुरेशी जोड न देणे. lap length
पहिल्या फोटो मध्ये हे दोन्हीही प्रकार झालेले दिसतात.
3) 12 मीटर च्या बारचे दोन तुकडे करून काॕलम जाळी बांधण्यासाठी वापरणे
4) फुटींग जाळीच्या स्टील ला एल बेंड न मारणे
5) बीम ज्या ठिकाणी काॕलम वर टेकवला जातो तिथे बीम मधील स्टील ला एल बेंड न मारणे - development length
6) स्लॕब चे स्टील बांधताना बेंट अप एरिया मध्ये पुरेसे टाय बार न बांधणे
7) बीम मधील एक्स्ट्रा टाॕप बार साठी कमी लांबीचे बार वापरणे.

हे असे शाॕर्टकटस आरसीसी बांधकामाच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासतात. भुज भुंकपात खुप आरसीसी इमारतींची पडझड झाली. अशा इमारतींचे निरीक्षण केल्यानंतर तज्ञांना अस जाणवल कि स्टील बांधण्याचे अगदी बेसिक नियमांकडे दुर्लक्ष झालेले होते.

दोन नंबरच्या फोटो मध्ये स्टीरप्स म्हणजे रिंग व्यवस्थित बांधलेल्या आपण बघू शकता. स्टील कटींग बेंडींग मधील शारीरिक मेहनत कमी करण्यासाठी महानगरातील साईटस वर वापरण्यात येणाऱ्या मशीनचे फोटो सोबत दिले आहेत.

तुम्ही कितीही भारी क्वाॕलिटीचे स्टील आणि सिमेंट वापरा, पण जर कामगारांच्या कडून कामात हयगय झाली तर काहीच उपयोग नाही. अशा चुका टाळण्यासाठी आपल्या बांधकामावर अनुभवी इंजिनियर ची देखरेख असण खुप महत्त्वाच आहे.

क्रमशः
इंजि. विद्यानंद गावडे
B. E. Civil

B. E.   #दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकामभाग 10 स्टील 2काही ठिकाणी माझ्या अस निदर्शनास आलय कि काॕलम आणि बिम साठी सरसकट 1...
08/03/2022

B. E.
#दर्जेदार_आणि_मजबूत_इमारत_बांधकाम

भाग 10 स्टील 2

काही ठिकाणी माझ्या अस निदर्शनास आलय कि काॕलम आणि बिम साठी सरसकट 12 किंवा 16 mm चे बार खरेदी केले जातात. घराचा प्लॕन तयार नसतो, मग आरसीसी डिझाईन तर खुप दूरची गोष्ट.

खरतर आधी घराचा प्लॕन आर्किटेक्ट करून तयार करून घ्यावा. हा प्लॕन घेऊन आरसीसी डिझायनरला भेटावे. आपण किती मजली घर बांधणार आहोत ते सांगावे आणि आपल्या घराचे आरसीसी डिझाईन तयार करून घ्यावे. त्यानंतरच आपल्याला कळू शकत कि कोणत्या डायमीटरचे किती स्टील लागणार आहे.

स्टील ची खरेदी ही वजनानुसार होते. या क्षेत्रातील काही नामवंत कंपन्या स्टीलच्या बंडल वर वजन प्रिंट करतात. आपण ज्या इंजिनियरकडून सुपरव्हिजन ची सर्विस घेत असाल ते तुम्हाला प्रत्येक कामासाठी किती किलो / टन स्टील लागणार ते सांगू शकतात. त्यानुसार हव्या त्या वेळीच स्टील खरेदी करा. पुढच्या वर्षी घर बांधायच आहे पण यंदा स्वस्त मिळतय म्हणून स्टील खरेदी करू नका. त्याला गंज लागतो. ही सुचना विशेषतः ग्रामीण भागासाठी आहे.

आरसीसी डिझायनर कडून खालील गोष्टी मागून घ्या

काॕलम आणि फुटींग - प्लॕन साईज, स्टील
ग्राऊंड आणि प्लीन्थ बिम - प्लॕन, बिम साईज आणि स्टील
फ्लोअर बिम - प्लॕन, साईज, स्टील
स्लॕब - जाडी, स्टील
जिना - जाडी, स्टील

काॕलम, बिम यांना रिँग कशा बांधायच्या हे ड्राईंग फार महत्त्वाच आहे. सध्या सगळ्या स्टील उत्पादक कंपन्या विविध साईज मध्ये रेडिमेड रिंग उपलब्ध करून देत आहेत. त्यांचा वापर करायला काहीच हरकत नाही.

विविध आरसीसी जाईंट च्या ठिकाणी स्टील कसे बांधावे याची ड्राईंग न चुकता घ्यावी. काँक्रिट ची ग्रेड कोणती हे सुद्धा आरसीसी डिझायनरलाच विचारावे.

आपल्या बांधकामाची दररोज देखरेख करणाऱ्या प्रोजेक्ट इंजिनियर कडून सेंटरिंग काँट्रॕक्टर आरसीसी आणि आर्किटेक्चरल ड्राॕईंग प्रमाणेच काम करताहेत याची खात्री करून घ्यावी.

हल्ली स्क्वेअर फुट पद्धतीने घराचे संपूर्ण बांधकाम एकाच मुख्य काँट्रॕक्टर ला देण्याची पद्धत रूढ होत आहे. संबंधित काँट्रॕक्टर स्वतः सिव्हिल इंजिनियर असेल किंवा नसेलही. यामध्ये सुद्धा इमारत मालकाने संबंधित काँट्रॕक्टर कडून सर्व ड्राईंग काम सुरू करण्या अगोदर तयार करून घ्यावीत.

आर्किटेक्ट, आरसीसी डिझायनर आणि प्रोजेक्ट इंजिनियर या तिघांचेही योगदान इमारत बांधकामात महत्वपूर्ण आहे.

क्रमशः
इंजि. विद्यानंद गावडे
B. E. Civil

Address

Powai
Mumbai
400072

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BLESS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share