''Bhagwangad''The Heavan''

''Bhagwangad''The Heavan'' The place on the earth founded by the GOD of vanjarians i.e. Saint Bhagwanbaba has ever unseen Ahmednagar and on the boundary of Beed District.

श्री क्षेत्र भगवानगड इतिहास

समाजकल्याणासाठी , जनहितासाठी अवघ्या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी ,सर्व समाज तळागाळातून जागा होण्यासाठी अध्यात्मिक क्रांतीची गरज होती आणि हीच गरज "भगवानगड" स्थापन करून भगवान बाबांनी अध्यात्मिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. "भगवानगड " प्रत्यक्षात उतरवण्याचे महान कार्य श्री संत भगवान बाबा यांनी केले. या गडाचा इतिहास फार पूर्वीचा आहे. पांडवाचे गुरु ' धौम्य ऋ

षी ' यांचे हे वास्तव्य स्थान. धौम्य नावाचा अपभ्रंश झाल्याने या डोंगरास धुम्या डोंगर असेही संबोधले जायचे. तेथे त्यांच्या पादुका आहेत.जवळच केदारेश्वराचे मंदिर रंग ऋषीच्या तपश्चर्येचे ठिकाण आहे. याच ठिकाणी भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे वास्तव्य ,हरिहरेश्वराचे भव्य मंदिर आणि जनार्दन स्वामीची समाधी आहे . अशा सप्त ऋषीचा वास असणाऱ्या परिसरात हा गड उभा आहे. "समाजाचे आपण काही देणे लागतो , जे मिळेल तेवढे , किंबहुना त्याही पेक्षा अधिक असे काही समाजाला द्यावे की ज्या मूळे समाजाचे कल्याण होईल " या तत्वावर भगवान बाबांनी भगवान गड साकारला .बाबा वास्तुशास्त्रात निपुण होते लाकडाचा वापर न करता संपूर्ण कामासाठी दगड वापरण्याचे बाबांनी ठरवले होते . ओवऱ्यासाठीचे दगडी खांडे नवगण राजुरी येथील राजूबाइच्या डोंगरावरून आणण्यात आली . हजारो वर्ष्या पासून पडलेल्या दगडी गोट्यांना चौकोनी चीर्यांचे रूप देण्यात आले .स्वतः बाबा परिसरातल्या सर्व घरा घरात फिरून गडाच्या बांधकामासाठी मदत मागत होते .जसे शक्य होईल त्या प्रकारच्या मदतीचे आवाहन ते समाजाला करत होते . समाजातून त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. रामाला जसे सेतू बांधताना खारीचीही मदत मोठी वाटली तसे भगवान बाबाला तन मन धनाने काम करणारे बांधव भेटले . स्त्रिया आपले अलंकार,आभूषणे बाबांना देत . घरून भाकरी आणून गडावर काम करणाऱ्यांची भूक भागवत होत्या.कसल्याही प्रकारची मजुरी न घेता परत जात होत्या . गडाचे काम चालू असताना गडावर पिण्याच्या पाण्यासाठी आसपासच्या गावांनी बैल गाड्यातून पाणी आणण्याची सोय केली होती . प्रत्येक गावाने एक दिवस पाणी पुरवण्याचा नेम ठरला होता . पारगाव, मालेवाडी,काटेवाडी , दैत्या नांदूर , सोनाशी ,कोनोशी, येळी अशा परिसरातील अनेक गावातून लोक गडासाठी काम करण्यास येत असत. गडाचे काम खूप भव्य असे होते. "आपल्याला प्रत्येक कामात भगवंतच मदत करतो " असा पूर्ण विश्वास असला पाहिजे असे बाबा सांगत. गडाच्या कामात कधीही कमी पडली नाही .प्रत्येक गाव गडासाठी लोकवर्गणी जमा करायचा .गडावर काम करणाऱ्यांची गर्दी होत असे.



श्री क्षेत्र भगवानगड

पाहता पाहता गडाचे काम पूर्ण झाले . भव्य दिव्य वास्तू उभी राहिली. अध्यात्माबरोबर शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतंत्र इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला . पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतीष्टा करण्यासाठी 'स्वामी सहजानंद सरस्वती महाराज ', ह.भ.प.मामासाहेब दांडेकर, मा. बाळासाहेब भारदे यांना, तसेच गडाच्या उद्घाटनासाठी त्या वेळेचे मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आले , आणि १ मे १९५८ या दिवशी गडाचा भव्य उद्घाटन सोहळा साजरा करण्याचे ठरले.

लोककल्याणासाठी चाललेल्या या कामात खंड पडू नये या साठी वाटेल ते करण्याची लोकांची तयारी होती. उद्घाटनाचा सोहळा हा शाही इतमातच पार पडायचा हा लोकांचा आग्रह होता .परंतु रस्त्यांची अवस्था इतकी बिकट होती कि कलेक्टर साहेबांनी खराब रेपोर्ट दिला तर दौरा रद्द होणार होता त्या मूळे जनसमुदायाने बाबांची परवानगी घेऊन श्रमदानाने रस्ता करण्याचे काम हाती घेतले. साहेब व्यवस्था पाहण्यासाठी आले .लोकांनी त्यांना गडावर आणले.भगवान बाबाची भेट घडवून दिली.बांधेसूद व्यक्तिमत्व ,करारी नजर, अचाट वक्तृतव आणि तेवढेच आपुलकीचे प्रेमाचे आदरातिथ्य यांनी खुद्द कलेक्टर साहेब भारावून गेले. बाबांनी साहेबाना सर्व गड फिरवून दाखवला.कार्यक्रमाची नियोजीत जागा दाखवली. सभामंडप, व्यासपीठ ,श्रमदानातून तयार केलेले रस्ते दाखवले.जनसमुदायासाठी केलेली सोय दाखवली. पाण्याची सोय केल्याचे दाखवले. हे सर्व वैभव बघताच कलेक्टर साहेब खुश झाले दौऱ्यासाठी " All Right "असा शेरा दिला .

सोहळ्याचा दिवस उजडला मंत्री महोदयाच्या स्वागताची तयारी प्रत्येक घरा गनिक होत होती . सणा वाराप्रमाणे घराच्या समोर रांगोळ्या घातल्या गेल्या होत्या.उत्साहाचे वातावरण होते . ढोल ,ताशे लेझीम पथके घेऊन परिसरातील मंडळीनी मंत्रीमोहोदयाचे स्वागत केले. भक्ती रसाचा नगारा अवघ्या पंचक्रोशीत दुमदुमला. बैलगाड्या, टांगे नाही तर पायीच जमेल तसे लोक गडावर जमा झाले होते. शेकडो लोक जमा झाले होते बैठक व्यवस्था कमी पडू लागली .पण जनसमुदयाची काळजी घ्यायला पंचमाहाभूतानी मदत केली, भर उन्हाळ्यात भर दुपारी आकाशात ढग दाटून आले शिरवळ पडले जनसमुदायास उन्हाचा अजिबात त्रास झाला नाही. निर्मल मानाने केलेल्या कार्यास नियतीचाही हातभार असतोच हे अजून एकदा सिद्ध झाले .

मा. मुख्यमंत्र्यांनी भाषणात गडास भक्तीचा गड "भगवान गड " म्हणून ओळखला जावा असे सुचविले, सर्व जनसमुदायास आनंद झाला .धौम्य गडाचा "भगवान गड" झाला, आणि भक्तीचा अखंड झरा वाहू लागला.
श्री क्षेत्र भगवानगड
It is a heaven placed in the Pathardi tahsil of Dist. It is that heaven placed by the the GOD of the great vanjarians thath is the saint Bhagwanbaba a great person by the help of the lokal peoples of Nagalwadi,Pargaon,Kharwandi,Bharajwadi and other villages around it. It is a hill station having a largest height placed in the balaghat dongar ranga.. There are various point to catch up having different type of trees animals and birds. The construction made by the peoples in the time of Bhagwanbaba is great and to be seen. It is totaly made by the elongated stones without other raw material. Near to it a Shivkalin shiv mandir is lokated in the Nagapur (british era ) ,Nagalwadi known as Kedareshwar temple which is situated in the vallies carrying big forests. It is 5km away from NH222 divides from kharwandi kasar. Bhagwangad is the major place of pilgrimage for Vanjaris. Shri saint Bhagwan baba was the prominent saint of the Vanjari community. He was followed by Bhimsinh baba. Currently Namdeo sanap shastri hold the gaddi of Bhagwan baba. Every year around 10 lakh Vanjari gather at bhagwan gad on Dussehara. Shri saint vaman bhau also the prominent saint of Vanjari community and guru of saint bhagwan baba...
Bhagwan Baba was born in a farmers family in Sawargaon, Dist. Beed, Maharashtra, his real name was Abaji. He was a very brilliant child which was evident from the fact that he use to top his class and soon was the apple of the eye, of all his teachers. But since he lived in a small village he could not enjoy the benefits of schooling and had to abandon his studies by the fifth or sixth standard as the school was not available beyond these levels at his village..

ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र कोटी कोटी अभिवादन 🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩श्री क्षेत्र भगवानगड🙏👍
04/01/2026

ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र कोटी कोटी अभिवादन 🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩श्री क्षेत्र भगवानगड🙏👍

पालखी रथ
06/11/2025

पालखी रथ

05/11/2025
Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Amol Jaybhaye, Sandeep Mundhe, Ganesh Sanap, Santos Dhaka...
29/10/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Amol Jaybhaye, Sandeep Mundhe, Ganesh Sanap, Santos Dhakane, Haribhau Garje, Ramesh Garje, Haribhau Jaibhay, Sandeep Dhakne, Govind Nagargoje, Bharata Vanave, बालाजी मुंडे, Kashinath Shripathi Sanap, दिनेश. सांगळे, गंगाधर आंधळे, Vaibhav Aghav Vaibhav Aghav, Pandurang Kendre, Bhausaheb Sonawane, Rajendra Ghule, Sukhdev Suravasae Sukhdev Suravase, ङोकफोङे ऱधुनाथ महादु, आदिनाथ विघ्ने, Bhagvan Kakade, आजिनाथ शेकडे आजिनाथ शेकडे, Gahinnath Jaybhaye, Abhiman Regude, Tanaji Kendre, Popat Mahajan, Vikas Sanap, फुलचंद हंगे

29/10/2025

Dnyaneshwari Temple at Bhagwangad
28/10/2025

Dnyaneshwari Temple at Bhagwangad

Address

Pathardi
414502

Alerts

Be the first to know and let us send you an email when ''Bhagwangad''The Heavan'' posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share