Tej Agro India

Tej Agro India Among India’s budding Greenhouse construction, a name that spells quality and trust Tej Agro India Pvt Ltd. set up in 2013 & in a way to expand its busines

23/10/2021

झाडांची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यासाठी झाडांना खते व सुक्ष्म अन्नद्रव्ये यांची गरज असते. हे घटक जमिनीतून शोषून घेण्यासाठी झाडांना पांढऱ्या मुळांची गरज असते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड मदत करते. ह्युमिक ॲसिडमुळे पांढऱ्यामुळ्यांची जोमदार वाढ होते. पर्यायने पिकांला आवश्यक ते अन्नद्रव्ये मिळण्यास ह्युमिक ॲसिड गरजचे असते. मात्र बाजारात अनेक प्रकारच्या निरोपयोगी घटकांची भेसळ केलेले ह्युमिक ॲसिडची विक्री केली जाते. त्यामुळे दर्जेदार हुमिक ॲसिड ओळखण्यासाठी पुढील विडीओ नक्की पहा !









12/10/2021
05/07/2021

ग्राहकाचे समाधान हेच व्यवसायाचे यश असतं. व्यवसायाच्या सुरुवातीलाच शेतकरी मित्रांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथील एका शेतकऱ्याचे मनोगत.......
(वीडियो - रवींद्र बाळकृष्ण सूर्यवंशी रा. विटा जि. सांगली
संपर्क- 8208165772)
- *ग्रीनरीच फर्टीलायझर*
संपर्क- *8817171515*
शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध राहुयात🌺👏

 #कृषीदिन
01/07/2021

#कृषीदिन



आज महाराष्ट्र कृषी दिन. राज्याचे पहिले महसूल मंत्री व तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील गहुली, ता. पुसद या गावात झाला. सलग 11 वर्षे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले एकमेव व्यक्ती म्हणजे वसंतराव नाईक होय. नागपूर विद्यापीठामधून B.A.LLB पदवी मिळवलेल्या वसंतरावानी काही काळ पुसदमध्ये वकिली व्यवसाय केला. 1946 ते 59 या कालावधीमध्ये त्यांनी पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद सांभाळलं. 1956 साली वसंतराव द्विभाषिक मुंबई राज्याच्या सहकार, कृषी, महसूल मंत्रीपदी विराजमान झाले. 1960 साली मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर वसंतरावांकडे महसूल खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. यशवंतराव चव्हाण यांची देशाचे संरक्षण मंत्री म्हणुन निवड झाल्यानंतर महाराष्ट्राची धुरा मारोतीराव कन्नमवार यांच्याकडे आली. परंतु अल्पकाळात मारोतीरांवाच्या निधनाने रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पदावर वसंतरावांची निवड करण्यात आली. 1963 ते 1975 या वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाला “कृषीपर्व” म्हणुनच ओळखलं जावं इतकं काम त्यांनी केले. त्यांच्या काळात महाराष्ट्रामध्ये राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली या ठिकाणी कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांनी महाराष्ट्राचा सर्व प्रादेशिक समतोलही साधला. रोजगार हमी योजनेची अमंलबजावणी, महाबीजची स्थापना, कापूस एकाधिकार योजना या सारख्या अनेक कामांचा समावेश त्यांच्या कार्यकाळात होतो. दुष्काळामध्ये गावतळी खोदण्याचा निर्णय घेत वसंतरावांनी पाणी आडवण्याच्या संकल्पनेला मुर्तरुप दिले. त्यामुळेच या बंधाऱ्याना वसंत बंधारा म्हणुन ओळखले जाते. शेती व शेतकरी संपन्न झाला तरच देश संपन्न होईल, असा संदेश देणाऱ्या वसंतरावांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हंटले जाते. वसंतरावांनी पुण्यात शनिवारवाड्यातील कार्यक्रमात “ पुढील दोन वर्षामध्ये महाराष्ट्र धान्याबाबत स्वंयपुर्ण झाला नाही तर मी स्वता फाशी जाईन ”अशी घोषणा करुन एकच खळबळ माजवली होती. पुढच्या दोन वर्षात वसंतरावानी अथक परिश्रम घेत महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वंयपुर्ण करुन आपला शब्द खरा करुन दाखवला. आपले संपुर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या विकासाकर्ता वाहणाऱ्या महामानवाच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.......

@ब्रम्हा चट्टे

#कृषीदिन



ग्रीनरीच फर्टीलायझरचे दर्जेदार उत्पादने आपल्या सेवेत.....शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध राहुयात🌺👏
24/06/2021

ग्रीनरीच फर्टीलायझरचे दर्जेदार उत्पादने आपल्या सेवेत.....
शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध राहुयात🌺👏







जो देणार वरदान दीर्घायुष्याचे,
जतन करूया त्याच्या आयुष्याचे ❤
वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षलागवड करूया !

#वटपौर्णिमा





1)संरक्षित शेती हि काळाची गरज असून बदलते हवामान पाहता , जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस व शेडनेट हाऊस ची उभारणी करणे ...
19/06/2021

1)संरक्षित शेती हि काळाची गरज असून बदलते हवामान पाहता , जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस व शेडनेट हाऊस ची उभारणी करणे आवश्यक आहे.
2)भाजीपाला रोपवाटिका योजना १० गुंठे क्षेत्रावरती करता येते . यामधून प्रति महिना १ लाख रोपे निर्मिती होऊ शकते. यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे .

प्रकल्प खर्च - रुपये ४.६० लाख
५० % अनुदान - रुपये २.३० लाख

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना भाजीपाला रोपवाटिका उभारणी ५०% शासकीय अनुदान संपर्क : तेज ऍग्रो इंडिया प्रा....
12/06/2021

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

भाजीपाला रोपवाटिका उभारणी

५०% शासकीय अनुदान

संपर्क : तेज ऍग्रो इंडिया प्रा. लि.
८८१७१७१५१५

12/06/2021

20/05/2021

Accounting, Tally, Quotations, Invoices, Salary

Today's Agrowon News Paper
17/02/2021

Today's Agrowon News Paper

07/10/2020

शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली, शेतकर्‍यांची कंपनी, शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध !

Address

101, Gulab Pavilion, Deccan Ghymkhana
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tej Agro India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share