मराठा

मराठा We are working for Maratha Community Social & Economic security. Join us...

10/11/2025

30/10/2025

छान कविता आणि सादरीकरण....संकर्षण कऱ्हाडे👏🌹

31/08/2025
14/08/2025

AC मधून जी हवा घरात येते त्यातून सुकलेल्या विष्ठे मधील सूक्ष्म जंतू युक्त धूळ घरात जाईल याची तिळमात्र कल्पना त्या कुटुंबाला नव्हती.

कबुतर उडते तेव्हा ही विष्ठा धूळ AC च्या बाहेरच्या outlet च्या मागच्या बाजूने जाळी मार्गे आतमधे जाते आणि तेथून आत येणारा पाईपमधुन हे जंतू बंद AC तून आत प्रवेश करतात. खिडक्या घट्ट बंद असतील तरी जंतू संसर्ग होतोच. हे जंतू पाणी, फिनेल, ॲसिड, डेटॉल यामधेही जिवंत राहतात हे नवल आहे...हे रिपोर्ट मधे हे लिहिलेले होते.

Report मधे लिहिलेली लक्षणे.. अशक्तपणा, सूका खोकला, ताप, पोटशूळ, सहजच घाम येणे, अंगाला सूज येते जाते, ऑक्झिजन लेव्हल कमी होणे, चीड चीड. विशेष एक लक्षण म्हणजे अचानक श्वास लागून हायपर होणे हे आहे...हे report मधे वाचून हादरलोच.

45 शी चा मित्र दोन महिने आजारपणामुळे त्रस्त होऊन एक्सरे आणि इतर टेस्ट करायला गेला.

योगायोग असा की ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट साठी गेले आणि उपचार चालू केले, ते डॉक्टर कपूर हे हल्लीच स्वतः वृद्धापकाळाने निवर्तले.

ॲक्यूट हाइपर सेंसिटीव्हिटी न्यूमोनाइटिस हे रोगाचे निदान झाले.
(हा रोग कबुतर विष्ठा यापासून होतो)

Doctor Kapoor हा दुवा गेल्यावर उपचार पद्धती आणि हॉस्पिटल दोन्ही बदलावी लागली.

Lungs आणि श्वासनलिका पूर्ण infected झाली होती....Report आले त्यात 60 % Lungs निकामी झाले होती हे नमूद केले होते.

चौकशी करता या विषया संदर्भात माहिती समोर आली. पण फार उशीर झाला होता आणि "यावर काहीच उपचार नाही पेशंट जगेल तितका जगवा" हे डॉक्टर जेव्हा म्हणाले तेव्हा तो मित्र हादरला.

ॲक्यूट हाइपर सेंसिटीव्हिटी न्यूमोनाइटिस मधे नक्की होते काय...???

Lungs मधील आतला भाग आकुंचित होत जातो आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते.
रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागतो.

विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही. प्रतिकार शक्ती कितीही चांगली असो effect होतोच.

Lungs प्रत्यारोपण ही सहज होऊ शकले नाही. कारण उपलब्धता नाही आणि costly आहे. शेवट म्हणता म्हणता मागील आठवड्यात त्या मित्राला मृत्यूने गाठले. आम्ही सर्व मित्र 2 मास्क नाकातोंडावर बांधूंन वैकूंठवासी यात्रेत सामील झालो.

कबुतर हा शांतीदुत नसून यमदुत आहे हे मित्राच्या मृत्यूने शाबीत केले.

आता त्या घरातील सर्व व्यक्तींना वर सांगितल्याप्रमाणे फूफ्फुसाचा रोग कमी जास्त प्रमाणात झालेला आहे.
उपचार सुरू आहेत पण पुढचं संपूर्ण आयुष्य हे श्वसनाच्या रोगाने त्रस्त असलेले ते उर्वरित कुटूंब मी पाहिले.
वाईट वाटले पण शुल्लक कबुतर किती मोठा घात करू शकते यावर विश्र्वास बसला...

SO SAD...BUT REALITY.

या विषय संदर्भात जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊन हे लिहिण्याचा
खटाटोप केला...कबुतर या विषयास थारा देऊ नये...

कारण इतर पक्षी प्राणी हे पाणी आणि माती mud bath याची आंघोळ करतात म्हणून ते स्वच्छ असतात पण कबुतर हे फार गलिच्छ आहे.
त्यामुळे रोग संक्रमण पूर्ण अंगभर घेऊन ते वावरत असते. काळ्या रंगाच्या पिसवा कबुतर विष्ठातून निर्माण होतात त्या सुईच्या टोका पेक्षा सूक्ष्म असतात.

मुंबई (zoo) प्राणी संग्रहालय आणि पुणे सर्प उद्यान मधील माझे मित्र डॉक्टर आणि डॉक्टर मैत्रीण यांनी कबुतर याबाबत अधिक खुलासा केला.

इतर पशूपक्षी हे दाणे आणि नैसर्गिक खाद्य खात असल्याने त्यांच्या मल मूत्र यातून संसर्ग होत नसतो आणि ती विष्ठा खत म्हणुन झाडाला पूरक असते.

कबुतर, वटवाघूळ, गिधाड, तरस आणि कमोडो ड्रॅगन यांची लाळ आणि विष्ठा Acidic आणि घातक असते.

12/06/2025

🚩 राम कृष्ण हरी...

*वाचा आणि विचार करा*

*वर्तमान समाजात पाय पसरणारी अशुभ लक्षणे खालीलप्रमाणे--*

१. कुटुंब लहान झालं
२. संबंध कमी झाले
३. झोप कमी झाली
४. केस कमी झाले
५. प्रेम कमी झालं
६. कपडे कमी झाले
७. शिष्टाचार कमी झाला
८. लाज-लज्जा कमी झाली
९. मर्यादा कमी झाली
१०. मुलं कमी झाली
११. घरात खाणे कमी झाले
१२. पुस्तक वाचन कमी झालं
१३. भावा-भावातील प्रेम कमी झालं
१४. चालणं कमी झालं
१५. खाण्या-पिण्यातली शुद्धता कमी झाली
१६. आहार कमी झाला
१७. तूप-लोणी कमी झालं
१८. तांब्या - पितळ्याची भांडी कमी झाली
१९. मन:शांती कमी झाली
२०. पाहुणे कमी झाले
२१. सत्य कमी झालं
२२. सभ्यता कमी झाली
२३. मनोमिलन कमी झालं
२४. समर्पण कमी झालं
२५.मोठ्या माणसांबद्दलचा सन्मान कमी झाला
२६. सहनशक्ती कमी झाली
२७. धैर्य कमी झालं
२८. श्रद्धा-विश्वास कमी झाला.

ज्यामुळे जीवन सोपं होतं सरळ होईल अशा आणखी बऱ्याचशा गोष्टी कमी झाल्यात.

मुलांना दोष नका देऊ
१) मुलाला अथवा मुलीला इंग्रजी माध्यमातून शिकवलं...
इंग्रजी बोलणं शिकवलं.
२) 'बर्थ डे' आणि 'मॅरेज ॲनिवर्सरी'
यासारख्या आयुष्यातील मंगलप्रसंगी इंग्रजी संस्कृती प्रमाणे जीवन जगण्यातच धन्यता मानली.
३) आई - बाबांना 'मम्मी' आणि
डॅडी' म्हणायला शिकवलं.

जेव्हा इंग्रजी कल्चर अंगी बाणवून मुलगा किंवा मुलगी मोठे झाल्यावर
१) आपल्याला वेळ देत नाहीत,
२) आपल्या भावना समजून घेत नाहीत,
३) आपल्याला तुच्छ मानून आपल्याशी अद्वातद्वा बोलतात ...
आणि आपल्याला मुलांमध्ये कुठलेच सुसंस्कार दिसत नाहीत,
तेव्हा घरातलं वातावरण खराब करण्यापेक्षा...
किंवा मुलांना दोष देण्यापेक्षा...
कुठेतरी एकांतात जाऊन रडून घ्या...

कारण...
मुलांत किंवा मुलींत त्यांच्या पहिल्या वाढदिवसापासूनच,
'भारतीय संस्कार' रुजवण्याऐवजी,
१. मंदिरात जाण्याऐवजी,
'केक' कसा कापावा?
हे शिकणारे आपणच असतो...
२. यज्ञ कुंडात आहुती कशा टाकाव्यात हे समजावणं... ? तसंच मंत्र, आरती, हवन, पूजा-पाठ, आदर-सत्कार यांबद्दलचे संस्कार त्यांच्यावर करण्याऐवजी...
केवळ सफाईदार इंग्रजी बोलण्यातच आपली शान आहे असं मुलांवर बिंबवणारेही बहुधा आपणच असतो ना...?

१) मूल जेव्हा पहिल्यांदाच घराबाहेर पाऊल टाकतं तेव्हा त्याला
नमस्कार-आशीर्वाद' यांच्या ऐवजी
'बाय-बाय' म्हणायला शिकवणारेही आपणच...

२) परीक्षा द्यायला घरून निघतांना
इष्टदेव/ घरातील थोरामोठ्यांना खरी वाकून नमस्कार करण्याला शिकवण्यापेक्षा त्याला
'Best of Luck'
म्हणून परीक्षा केंद्रावर सोडणारे आपणच...

३) मुलगा/ मुलगी
परीक्षेत पास झाल्यावर घरात आपल्या कुटुंबासोबत एकत्र बसून दिलखुलास मनमोकळ्या गप्पा मारण्याऐवजी...
हॉटेलात पार्टी देण्याच्या प्रथेला स्थापित करणारे आपणच...

४) मुला मुलीच्या विवाहनंतर त्यांना कुटुंबाच्या इष्ट देवतेचे दर्शन घेण्यासाठी पाठवण्या आधी...
'हनीमून' साठी परदेशी किंवा टूरिस्ट स्पॉट' ला पाठवण्याची तयारी करणारे आपणच ...

अशाच आणखीन कितीतरी इंग्रजी कल्चरला आपण जाणता अजाणता स्वीकारलेलं असतं...

आता तर घरातल्या थोरामोठ्यांच्या आणि इतर ज्येष्ठ माणसांच्या पाया पडायला देखील तरुण पिढीला लाज वाटू लागली आहे...

यात चूक कुणाची..?
केवळ आपली! (-बाप किंवा आईं?)...

इंग्रजी अंतर्राष्ट्रीय भाषा' आहे.....?
व्यवहारासाठी ती शिकायलही हवी...?

इंग्रजांची 'संस्कृतीसुद्धा' जीवनात अंगीकृत करायलाच हवी अशी तर जबरदस्ती कुणी केली नव्हती ना?

आपल्या समृद्ध संस्कृतीचा त्याग करून नैतिक मूल्ये,
मानवीय भावना रहित
अन्य संस्कृतींची जीवनशैली स्वीकारून आपण काय मिळवलं?

अवैध संबंध?
विभक्त कुटुंबं? व्यसनयुक्त शरीरं?
थकलेली मनं?
कपटी नाती? अभद्र,अनुशासनहीन मुलं?
असुरक्षित समाज?
भयावह भविष्य?

*एकदा आपण सर्वांनी विचार अवश्य करावा की*
*संस्कारी पीढ़ी का* *आवश्यक असते* ❓
*चला आपण सर्व आजपासूनच आपल्या महान संस्कृतीचे पालन करायला लागूया*
*तेव्हाच खरा सूर्योदय होईल*

11/03/2025

*आपल्या सात पिढ्या म्हणजे काय ?*

*भारतीय प्राचीन तर्कशुद्ध परंपरा*
*पिढी-गुणसुत्र आणि नातं*

1) नवरा बायको --- पहिली पिढी
2) मुलं (सख्खी भावण्डं) --- दुसरी पिढी --- आई वडिलांकडून 50%-50% गुणसूत्रे मिळतात. (50% गुणसुत्रे share करतात.)
3) तिसरी पिढी --- नातवंडे --- पहिली पिढी म्हणजे आजी आजोबांची 25% गुणसुत्रे share करतात.
4) चौथी पिढी --- पहिल्या पिढीचे 12.5% गुणसुत्रे share करतात.
5) पाचवी पिढी --- पहिल्या पिढीचे 6.25% गुणसुत्रे share करतात.
6) सहावी पिढी --- पहिल्या पिढीचे 3.12 % गुणसुत्रे share करतात.
7) सातवी पिढी -- पहिल्या पिढीचे 1.56% गुणसूत्रे share करतात.
8) आठवी पिढी ---पहिल्या पिढीचे < 1% share गुणसुत्रे करतात.

म्हणून मुळ स्त्री पुरुष जोडप्यापासून सातव्या पिढीपर्यंत नातं, भाऊबंदकी मानतात. नात्यात म्हणजे सातव्या पिढीपर्यंत विवाह निषिद्ध मानतात. विवाह केल्यास जन्मजात गुणसुत्रीय आजारांची शक्यता असते.

*आठव्या पिढीपासुन नातं, भाऊबंदकी मानत नाहीत, म्हणून पती-पत्नीचं नातं हे सातजन्मांचं मानतात. सात जन्मं हे नातं टिकतं.*

तीन पिढ्या सपिण्ड मानतात. तीन ते सात पिढ्या सपिण्ड नव्हे पण भाऊबंदकी मानतात.
आणि *सात पिढ्यांनंतर नातं संपुष्टात येतं, पण सगोत्र राहतात !*

*खरंच आपले पुर्वज किती ज्ञानी होते याचा आपल्याला अभिमान पाहिजे*

*सात पिढ्यांचा उल्लेख नेहमी केला जातो पण त्याच्या मागचे कारण आज समजले.*

Address

Hadapsar
Pune
411028

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share